लखनौ : देशात आता ५ राज्यांमध्ये निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. मतदान जरी वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये होणार असलं तरी पाचही राज्यांच्या निवडणुकांचा निकाल हा १० मार्च रोजी लागणार आहे. या पाचही राज्यांच्या निवडणुकांसाठी राजकारण चांगलेच पेटलेले दिसत आहे.
पुणे महापालिका निवडणूक लांबणीवर पडण्याची जोरदार चर्चा…
महाराष्ट्रात सत्तेत असणारी शिवसेना आता भारतीय जनता पक्षाला इतरही राज्यांमध्ये कडवी झुंझ देण्याची शक्यता आहे. गोवा आणि उत्तरप्रदेशमध्ये शिवसेना आपले उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे यावेळी अयोध्येतून लढणार असल्याची चर्चा सुरु आहे.
महापौर पेडणेकरांच्या कंपनीला कोविड केंद्राचे १.९७ कोटींचे पेमेंट – किरीट सोमय्या
शिवसेना आता अयोध्येत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात विरोधात उमेदवार देणार आहे. मथुरेतून शिवसेना प्रचारचा नारळ फोडणार आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. शिवसेना युपीमध्ये ५० ते १०० जागा लढवणार आहेत. मागील विधानसभेला देखील शिवसेनेने उत्तरप्रदेशात विधानसभेसाठी उमेदवार दिले होते. याचा फटका काही ठिकाणी भाजपला बसला होता. संजय राऊत हे आज शेतकरी नेते राकेश टिकैत यांना भेटणार आहेत. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीबाबत त्यांचा कल जाणून घेणार आहे. त्यानंतर शिवसेनेने कोणत्या जागांवर लढायचं, किती जागांवर लढायचं हे ठरवणार आहोत, असं राऊत म्हणाले.
गोवा, यूपीत राष्ट्रवादीने एक एक आमदार धरून आणलेत; चंद्रकांत पाटलांचा खोचक टोला
यावेळेसच्या उत्तरप्रदेशमधील निवडणुकीत शिवसेनेला आपलं अस्तित्व सिद्ध करायचं आहे. मला खात्री आहे यावेळी आम्ही ज्या पद्धतीनं लढायचं ठरवलं त्यामुळे आमचे नक्कीच काही आमदार उत्तरप्रदेशच्या विधानभवनात दिसून येतील. संजय राऊत म्हणाले की, अयोध्येच्या प्रभू श्रीराम मंदिरासाठी शिवसेनेनं मोठा संघर्ष केला आहे. आम्ही त्या विषयाला चालना दिली. याचं श्रेय कुणी दुसऱ्यांनी घेऊ नये. दोन ते तीन दिवसांमध्ये मी युपीमध्ये जाणार आहे असं देखील राऊतांनी म्हटलं आहे.
Read also:
- कोरोनामुक्त होताच रोहित पवारांनी मतदारसंघ गाठला; कर्जत नगरपंचायतीच्या निवडणुकीची रणनिती?
- मंत्री छगन भुजबळ पुन्हा अडचणीत? अंजली दमानियांचे न्यायालयात आवाहन… काय नेमकं प्रकरणं…
- भाजपला धक्यावर धक्के; तब्बल सात आमदारांचे राजीनामे, मोदी लाट ओसरली?
- पंतप्रधानांनी बोलावलेल्या बैठकीला उद्धव ठाकरेंची दांडी; मुख्यमंत्र्यांच्या जागी कोणाची हजेरी?
- ‘नोटा’ पेक्षा कमी मत पडणाऱ्या पक्षाच्या प्रवक्त्याला तुम्ही महत्व तरी देता का? फडणवीसांचे प्रत्यूत्तर