कर्जत : पहिल्या, दुसऱ्या लाटेत कोरोनाला थोपवणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार तिसऱ्या लाटेत मात्र कोरोना पॉझिटिव्ह आले. 3 जानेवारी रोजी रोहित पवार यांनी आपण कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती ट्विटरद्वारे दिली होती. त्यानंतर आता रोहित पवार कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनावर मात केल्यानंतर ते पुन्हा एकदा कर्जत नगर पंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी उतरले आहेत. त्यांनी थेट मतदारसंघाच गाठला आहे.
महापौर पेडणेकरांच्या कंपनीला कोविड केंद्राचे १.९७ कोटींचे पेमेंट – किरीट सोमय्या
कर्जत नगर पंचायतीच्या उर्वरित चार जागांच्या निवडणूक प्रचारासाठी ते पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. यावेळी कार्यकर्ते आणि महिलांनी औक्षण करुन रोहित पवारांचं स्वागत केलं. त्यावेळी बोलताना रोहित पवार म्हणाले की, कोरोनातून बरे होण्यासाठी अनेकांनी प्रार्थना केली होती. त्यामुळे कालच प्राथमिक चाचणी निगेटिव्ह आली. डॉक्टरांनी विश्रांती घ्यायला सांगितली होती. लोकही सांगतात की विश्रांती घ्या. पण निवडणूक आहे. लोकांमध्ये आल्यावर एक वेगळी ऊर्जा मिळते. विधानसभेला कार्यकर्ते माझ्यासाठी पळाले. आता त्यांच्यासाठी लोकांना विनंती करणं माझं काम आहे, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली आहे.
कोरोनातून बरं झाल्यानंतर आज कर्जतमध्ये नगर पंचायत निवडणुकीच्या प्रचारार्थ उतरलो यावेळी प्रभागातील नागरिकांशी संवाद साधला. pic.twitter.com/uFH3n2euck
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 12, 2022
यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, “देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असताना सुध्दा पवार साहेब जनतेमध्ये मिसळून त्यांची मदत करताना दिसतात.” कोरोनाच्या काळात एकही दिवस घरी न बसता त्यांनी जनतेला मोठ्या प्रमाणात आधार दिला.
Read also:
- मंत्री छगन भुजबळ पुन्हा अडचणीत? अंजली दमानियांचे न्यायालयात आवाहन… काय नेमकं प्रकरणं…
- भाजपला धक्यावर धक्के; तब्बल सात आमदारांचे राजीनामे, मोदी लाट ओसरली?
- पंतप्रधानांनी बोलावलेल्या बैठकीला उद्धव ठाकरेंची दांडी; मुख्यमंत्र्यांच्या जागी कोणाची हजेरी?
- ‘नोटा’ पेक्षा कमी मत पडणाऱ्या पक्षाच्या प्रवक्त्याला तुम्ही महत्व तरी देता का? फडणवीसांचे प्रत्यूत्तर
- गोवा, यूपीत राष्ट्रवादीने एक एक आमदार धरून आणलेत; चंद्रकांत पाटलांचा खोचक टोला