मुंबई : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ पुन्हा अडचणीत येण्याची शक्यत दिसून येत आहे. कारण, महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने दिलेल्या निर्णयविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ही याचिका दाखल केली आहे. दरम्यान करोनामुळे उच्च न्यायालयात तातडीच्या याचिकेंवरच सुनावणी होत असल्याने या याचिकेवर सुनावणीसाठी महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे भुजबळांचे टेंन्शन पुन्हा वाढण्याचे चिन्हा दिसून येत आहे.
महापौर पेडणेकरांच्या कंपनीला कोविड केंद्राचे १.९७ कोटींचे पेमेंट – किरीट सोमय्या
महाराष्ट्र सदन कथित घोटाळा प्रकरणी ९ सप्टेंबरला छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या(एसीबी) न्यायालयाकडे दोषमुक्त करण्यासाठी भुजबळांनी अर्ज दाखल केला होता. छगन भुजबळ यांच्यासोबत त्यांचा पुतण्या समीर भुजबळ यांनीही हा अर्ज दाखल केला होता. आपल्यावर करण्यात आलले आरोप हे निराधार आहेत. त्यामुळे न्यायालयाने आपल्याला दोषमुक्त करावे असे भुजबळ यांनी म्हटले होते. त्यानंतर न्यायालयाने भुजबळांची निर्दोष मुक्तता केली होती. यानंतर अंजली दमानिया यांनी हायकोर्टात जाणार असल्याचं सांगितलं होतं.
Maharashtra Sadan Scam
ACB did not challenge the order discharging Shri Chhagan Bhujbal and hence as my duty as an Activist, I have
filed an Appeal in Mumbai High Court against the discharge given by the Sessions Court to Shri Chhagan Bhujbal in the Maharashtra Sadan Scam. pic.twitter.com/ir29uIwXVL— Mrs Anjali Damania (@anjali_damania) January 13, 2022
छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता करण्याच्या न्यायालयाच्या निर्णयाला भ्रष्टाचार विरोधी कार्यालयाने आव्हान दिलं नसल्याने एक कार्यकर्ता म्हणून माझी जबाबदारी आहे. मी मुंबई उच्च न्यायालयात सत्र न्यायालयाने महाराष्ट्र सदन घोटाळ्यात छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्तता केल्याच्या निर्णयाला आव्हान दिलं आहे.
Read also:
- भाजपला धक्यावर धक्के; तब्बल सात आमदारांचे राजीनामे, मोदी लाट ओसरली?
- पंतप्रधानांनी बोलावलेल्या बैठकीला उद्धव ठाकरेंची दांडी; मुख्यमंत्र्यांच्या जागी कोणाची हजेरी?
- ‘नोटा’ पेक्षा कमी मत पडणाऱ्या पक्षाच्या प्रवक्त्याला तुम्ही महत्व तरी देता का? फडणवीसांचे प्रत्यूत्तर
- गोवा, यूपीत राष्ट्रवादीने एक एक आमदार धरून आणलेत; चंद्रकांत पाटलांचा खोचक टोला
- पंतप्रधान मोदींच्या पंजाब प्रवासातील घटना ही घातपाताचाच प्रयत्न असल्याचे स्पष्ट