छत्रपती संभाजीनगर : बैठकीआधीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेली औरंगाबाद येथील राज्य सरकारच्या कॅबिनेत बैठकच्या वेळी तब्बल १५ मोर्चे निघणार असल्याची माहिती समोर आली आहे. वारेमाफ खर्च, अन् विविध कारणांमुळे राज्य सरकारची कॅबिनेट बैठक होण्याच्या आधीच त्यावर राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. यातच बैठक होण्याच्या आधीच राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा…उद्धव ठाकरे हेच सर्वोत्तम मुख्यमंत्री ! सर्व्हेत ठाकरेंना जनतेची पसंती, शिंदेंना फक्त ३.९० तर फडणवीसांना ६.७६ टक्के पसंती
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच्या नामकरण फलकांचे अनावरण करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगर महसुली विभागासह जिल्हा, उपविभाग, तालुका, गावाचे आणि धाराशिव जिल्हा, उपविभाग, तालुका, गावाचे नामकरण करण्यात करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात राज्य सरकारने परिपत्रकही काढले आहे.
हेही वाचा…ठाकरे गटाकडून ५०० तर शिंदे गटाकडून ६००० पानी उत्तर, कोर्टातील ‘ती’ सुनावणी फार महत्वाची
छत्रपती शिवाजी महाराज की जय…छत्रपती संभाजी महाराज की जय… या जयघोषाच्या निनादात छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच्या नामकरण फलकांचे आज अनावरण केले. छत्रपती संभाजीनगर महसुल विभागासह जिल्हा, उपविभाग, तालुका, गावाचे आणि धाराशिव जिल्हा, उपविभाग, तालुका, गावाचे नामकरण यावेळी करण्यात आले. असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र पडणवीस यांनी ट्विट केलं आहे.
हेही वाचा…राज्यातील ‘या’ माजी मंत्र्यांच्या मुलाला शरद पवारांचं बळ, पुण्यात राष्ट्रवादीची ताकद वाढली
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते छत्रपतीसंभाजीनगर शहरातील विविध प्रकल्प, इमारतींचे दूरदृश्य प्रणालीद्वारे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात आले. सातारा व देवळाई परिसरातील मलनि:स्सारण योजनेचे भूमिपूजन तर हर्सूल येथील घनकचरा प्रक्रिया केंद्राच्या लोकार्पणाचा यात समावेश आहे. केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री संदिपान भुमरे, कृषी मंत्री धनंजय मुंडे, आरोग्य मंत्री तानाजी सावंत, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार आदी मान्यवर उपस्थित होते.
🕦 11.35am | 16-9-2023 📍 Chhatrapati Sambhajinagar | स. ११.३५ वा. | १६-९-२०२३ 📍 छत्रपती संभाजीनगर.
🔸छत्रपती शिवाजी महाराज की जय…छत्रपती संभाजी महाराज की जय… या जयघोषाच्या निनादात छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच्या नामकरण फलकांचे आज अनावरण केले.
छत्रपती संभाजीनगर महसुल… pic.twitter.com/rd15tyHJTr— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 16, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“तर केंद्रीय मंत्र्यांच्या दारासमोर कांदे, टोमॅटो फेकल्याशिवाय स्वस्त बसणार नाही”, ‘या’ संघटनेने दिला सरकारला इशारा
हेही वाचा…अबब..! मराठवाड्यासाठी शिंदेंनी दिलं तब्बल ‘इतक्या’ कोटी रूपयांचं पॅकेज, आकडा ऐकून थक्क व्हाल
हेही वाचा…“शासन आपल्या दारी, पैसे उधळतंय वाऱ्यावरी, मोर्चेकरी दारावरी, सरकार झाडतंय बंदोबस्ताच्या फैरी”
“तुम्ही अडीच वर्ष माशा मारत होतात का ?”, फडणवीसांचा ठाकरेंना खोचक सवाल
हेही वाचा…मोठी बातमी…! छत्रपती संभाजीनगर अन् धाराशीव शहाराच्या नामांतरणाबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय