पुणे : राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर पक्षाला उतरती कळा लागली असतांना अनेक जण शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करीत आहेत. तसेच आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष तयारी करतांना दिसत आहेत. यातच काल माजी मंत्री वसंतराव चव्हाण यांच्या चिरंजीवांनी राष्ट्रवादी काॅंग्रेस झेंडा हाती धरला आहे. याची चर्चा पुण्यात सध्या जोरदार सुरू आहे.
हेही वाचा…मराठवाड्यात राज्यमंत्री मंडळाची अलिशान बैठक; शेतकरी मात्र हैराण!
महाराष्ट राज्याचे माजी मंत्री वसंतराव चव्हाण यांचे चिरंजीव कणव वसंतराव चव्हाण यांनी काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला आहे. राज्याच्या माजी मंत्र्यांच्या मुलाला आता शरद पवारांनी बळ दिलंय. अशी चर्चाही त्यानंतर रंगू लागली. तसेच महाराष्ट्र प्रदेश युवक काॅंग्रेसचे माजी अध्यक्ष सचिन तावरे यांनी देखील शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला आहे.
हेही वाचा…“शरद पवार अन् उद्धव ठाकरेंसाठी ‘तो’ निर्णय गेमचेंजर ठरणार” , महत्वाच्या तारखा जाहीर
दरम्यान, यावेळी पुण्याचे शहाराध्यक्ष प्रशांत जगताप, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अंकूश काकडे, माजी शहाराध्यक्ष रविंद्र माळवदकर, प्रकाश आप्पा मस्के आदि उपस्थित होते. तर राजकीय, सामाजिक व संघटनात्मक कार्यातील त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाला नक्कीच फायदा होईल व संघटनेच्या बांधणीसाठी ते अखंड कार्यरत राहतील, असा विश्वास प्रशांत जगताप यांनी व्यक्त केला.
READ ALSO :
हेही वाचा…“कॅबिनेटची बैठक, अति उत्साहात सरकार ४० हजार कोटी रुपयांचा निधी देणार”
हेही वाचा…कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी एकाच ठिकाणी, अजित पवार अन् फडणवीस विरोधात आंदोलन करणार
हेही वाचा…कॅबिनेट बैठकीवर ‘हे’ 15 मोर्चे धडकणार, शहराला पोलीस छावणीचे स्वरूप
हेही वाचा…ठाकरेंच्या शिलेदारांवर चौकशा अन् गुन्हे दाखल होण्याचे शुल्ककाष्ठ, आणखी एक ‘हा’ शिलेदार अडचणीत
हेही वाचा…गोकूळ संघाच्या सभेवरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्या, महाडिक गटांचा सतेज पाटलांवर गंभीर आरोप