पिंपरी चिंचवड : पिंपरी- चिंचवड शहाराला मावळातील पवना धरणातून बंद जलवाहिनीतून पाणी आणण्याच्या योजनेवरून सध्या राजकीय वातावरण चांगलचं पेटलं आहे. या योजनेवरील स्थगिती स्थानिक शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असूनही त्यांना विचारात न घेता सरकारने त्यावरील स्थगिती सरकारने उठवली असल्याची चर्चा सुरू आहे. यावरून आता मवाळमध्ये सर्वपक्षीय नेत्यांनी आंदोलनाचा पवित्रा हाती घेतला आहे. आश्चार्य म्हणजे कट्टर विरोधक एकाच ठिकाणी आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
हेही वाचा…“राणा-यशोमती ठाकूर वादात बच्चू कडूंची उडी,” फडणवीसांचा उल्लेख करत तक्रार दाखल करणार
पवना धरणातून बंद जलवाहिनीतून पाणी आणण्याच्या योजनेवरील स्थगिती उठवण्याकरिता स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. त्यावर अजित पवार सत्तेत सामील झाल्यानंतर ती स्थगिती आता उठवण्यात आली आहे. असा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. मात्र हा आरोप आमदार सुनील शेळके यांनी फेटाळून लावला आहे. यातच काल सर्वपक्षीय नेत्यांनी आंदोलनाची हाक पुकारली त्यात अजित पवार महायुतीत सामील होण्यापुर्वी कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी म्हणून असलेले मावळ राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके आणि माजी आमदार तथा माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी मोर्चाचे नेतृत्व केलं. स्थानिक आमदार शेळके, खासदार श्रीरंग बारणे यांनी मोर्चाचे नेतृत्व करावे, असं परवाच्या सर्वपक्षीय बैठकीत ठरले होते.
हेही वाचा…पैशाचा वारेमाफ खर्च..! “कॅबिनेट बैठक आहे की महायुतीच्या मंत्र्यांचे पर्यटन ?” वडेट्टीवारांचा सवाल
दरम्यान, पवना बंदिस्त जलवाहिनीविरोधी सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने यावेळी तहसीलदारांमार्फेत सरकारला निवेदन देण्यात आले. त्यात स्थगिती उठविण्याचा निर्णय स्थगित करून हा प्रकल्प येत्या दहा दिवसांत रद्द केला नाही, तर रास्ता रोको आणि रेल रोको सारखे आंदोलन केले जाईल. असा इशाराही त्यात देण्यात आला.
READ ALSO :
हेही वाचा…कॅबिनेट बैठकीवर ‘हे’ 15 मोर्चे धडकणार, शहराला पोलीस छावणीचे स्वरूप
हेही वाचा…ठाकरेंच्या शिलेदारांवर चौकशा अन् गुन्हे दाखल होण्याचे शुल्ककाष्ठ, आणखी एक ‘हा’ शिलेदार अडचणीत
हेही वाचा…गोकूळ संघाच्या सभेवरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्या, महाडिक गटांचा सतेज पाटलांवर गंभीर आरोप
हेही वाचा…मराठवाड्यात राज्यमंत्री मंडळाची अलिशान बैठक; शेतकरी मात्र हैराण!
हेही वाचा…“शरद पवार अन् उद्धव ठाकरेंसाठी ‘तो’ निर्णय गेमचेंजर ठरणार” , महत्वाच्या तारखा जाहीर