छत्रपती संभाजीनगर : राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक येत्या १६ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे होत आहे. या मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री यांच्यासह २९ मंत्री, सुमारे २५० सचिव, उपसचिव आणि वरिष्ठ दर्जाचे अधिकारी येत आहेत. या सर्वांसाठी छत्रपती संभाजीनगर येथील हॉटले, विश्रामगृहात खोल्यांचे बुकींग करण्यात आले आहे. यावरून आता राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
हेही वाचा…“अन्यथा दलालांचे खिसे भरणाऱ्या सरकारला धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाही”
राजा खातोय तुपाशी, शेतकरी मात्र उपाशी. सरकारने जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी. विश्रांतीला फाईव स्टार हॉटेल, जेवायला १५०० रुपयांची थाळी. असं म्हणत दुष्काळग्रस्त भागासाठी कॅबिनेट बैठक आहे की महायुतीच्या मंत्र्यांचे पर्यटन ? असा सवाल देखील विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. तसेच कोणासाठी किती रूम बुक केल्या आहेत ? याचा तपशील देखील विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
हेही वाचा…धक्कादायक….! ठाकरे गटाच्या युवती सेनेच्या महिलेची मुलांसमोरच चाकूने भोसकून हत्या, एकच खळबळ
दरम्यान, फाईव स्टार हॉटेल 30 रूम बुक (मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सर्व मंत्री) ताज हॉटेल 40 रूम बुक (सर्व सचिव) अमरप्रीत हॉटेल 70 रूम बुक (उपसचिव, खासगी सचिव, कक्ष अधिकारी) अजंता अॅम्बेसेडर 40 रूम बुक (उपसचिव, खासगी सचिव, कक्ष अधिकारी) महसूल प्रबोधिनी 100 रूम (सुरक्षा रक्षक, वाहनचालक) पाटीदार भवन 100 (सुरक्षा रक्षक, वाहनचालक) वाल्मी, सिंचन, महावितरण, सुभेदारी विश्रामगृहे – 20 ( इतर अधिकारी) एकूण 150 गाड्या नाशिक येथून भाड्याने घेण्यात आल्या आहेत. औरंगाबाद शहरातील देखील 150 गाड्या भाड्याने घेण्यात आल्या आहेत. मंत्रिमंडळ बैठकीसाठी नम्रता कॅटर्सला जेवणाचं कंत्राट देण्यात आले असून, एका थाळीची किंमत 1 हजार ते दीड हजार असणार आहे. असा सवालही त्यांनी केलाय.
राजा खातोय तुपाशी, शेतकरी मात्र उपाशी.
सरकारने जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी.
विश्रांतीला फाईव स्टार हॉटेल, जेवायला १५०० रुपयांची थाळी…
दुष्काळग्रस्त भागासाठी कॅबिनेट बैठक आहे की महायुतीच्या मंत्र्यांचे पर्यटन ?फाईव स्टार हॉटेल 30 रूम बुक (मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,… pic.twitter.com/NMQZ0TdB12
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) September 15, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“जम्मू काश्मिरमध्ये तीन जवान शहीद झाले, तेव्हा भाजपच्या कार्यालयात कशाचा आनंद साजरा केला ?”
हेही वाचा…“राज्य असंतोषात धगधगत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री राजस्थानमध्ये पक्षाच्या प्रचारासाठी”
हेही वाचा…“..तर राजीनामा देईन,” अजित पवारांच्या दोन्ही कट्टर समर्थक नेत्यांमध्ये ताळमेळचा अभाव ?
हेही वाचा…गोकूळच्या सभेत मोठा राडा, महाडिक समर्थक आक्रमक, बॅरिकेट्स तोडून आत घुसण्याचा प्रयत्न
हेही वाचा…प्रचंड खर्च..! “मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी फाईव्ह स्टार हॉटेल्स, ३०० गाड्यांचा ताफा, 1500 रु. जेवणाची एक थाळी”