कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाची आज ६१ वी सर्वसाधारण सभा गोकूळ शिरगाव येथील पंचतारांकीत वसाहत येथील महालक्ष्मी पशुखाद्य येथील मैदानात होत आहे. परंतु या सभेच्या आधी सत्ताधारी आणि विरोधक पुन्हा आमनेसामने आले आहेत. सभेच्या आधीच विरोधी आघाडीच्या संचालिका शौमिक महाडिक यांनी हल्लाबोल केला होता. आज महाडिक समर्थकांनी सभेत घुसण्याचा प्रयत्न केल्याने मोठा गोंधळ याठिकाणी बघायला मिळाला आहे. त्यामुळे गोकूळची सभा आता वादळी ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा…विलासराव देशमुख, चव्हाण, फडणवीस या मुख्यमंत्र्यांची परंपरा शिंदे मोडीत काढणार, तब्बल ३२ हजार रूपये…,
सत्ताधाऱ्यांनी गेल्या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये १२०० हून अधिक दूध संस्था काढल्या, मग गोकुळच्या दूध संकलनात वाढ का झाली नाही? त्या संस्था केवळ राजकारण, निवडणुका आणि मतांसाठी काढल्या का? याचा जाब विचारण्याची वेळ आली आहे. असा हल्लाबोल काल विरोधी आघाडीच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी सतेज पाटिल यांच्यावर केला होता. त्यानंतर आज महाडिक समर्कांनी सभेत घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिस आणि समर्थकांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. यातच काहींनी बॅरिकेट तोडून आत घुसण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा…“घराणेशाहीतून भाजप झालीय भ्रष्टाचारी” भाजप मंत्र्यांच्या मुलीने लुटला १० कोटींचा निधी, राष्ट्रवादीची जोरदार टिका
दरम्यान, आज सभेतमध्ये झेरॉक्स कॉपी घेऊन नकली सभासद बसले आहेत. या सभेत निम्म्यापेक्षा अधिक जण बोगस असून त्यांना याचठिकाणी उभं राहून झेराक्स कॉप्या वाटण्यात आल्या आहेत. बाहेर दोन किलीमिटर रांगेत उभे आहेत. त्यांना अजूनही आतमध्ये प्रवेश दिलेला नाही. पोलिसांनी बॅरिकेट लावले आहेत. खरे सभासद येऊन त्यांना प्रश्न विचारले जाऊ नये, म्हणून त्यांनी नकले सभासद घेतले आहेत. याठिकाणी पाणी नाही, काही सोईसुविधा नाही, सभा सुरू असूनही काही गोष्टींचा तपास नाही. अशी टिका शौमिका महाडिक यांनी म्हटले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…प्रचंड खर्च..! “मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी फाईव्ह स्टार हॉटेल्स, ३०० गाड्यांचा ताफा, 1500 रु. जेवणाची एक थाळी”
हेही वाचा…“अन्यथा दलालांचे खिसे भरणाऱ्या सरकारला धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाही”
हेही वाचा…धक्कादायक….! ठाकरे गटाच्या युवती सेनेच्या महिलेची मुलांसमोरच चाकूने भोसकून हत्या, एकच खळबळ
हेही वाचा…शीतल म्हात्रेंची किशोरी पेडणेकरांवर जोरदार टिका, म्हणाल्या की, “सटरफटर कचोरी ताईंच्या..,”
हेही वाचा…“कारण नसतांना मला ट्रोल केलं जातंय,” अजित पवारांनी व्यक्त केली नाराजी