छत्रपती संभाजीनगर : राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक येत्या १६ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे होत आहे. या मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री यांच्यासह २९ मंत्री, सुमारे २५० सचिव, उपसचिव आणि वरिष्ठ दर्जाचे अधिकारी येत आहेत. या सर्वांसाठी छत्रपती संभाजीनगर येथील हॉटले, विश्रामगृहात खोल्यांचे बुकींग करण्यात आले आहे.
हेही वाचा…“शेतकऱ्यांची योजना अन् ‘या’ भाजप मंत्र्यांची मुलगी योजनांची लाभार्थी, काॅंग्रेसचा हल्लाबोल
मंत्रिमंडळाची बैठक असेल तर मुख्यमंत्र्यांचा मुक्काम सुभेदारी या सरकारी विश्रामगृहातच असतो. मनोहर जोशी, विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, देवेंद्र फडणवीस यांनी ती पंरपरा निर्माण केली होती. मात्र एकनाथ शिंदे यांनी ती पंरपरा मोडीत काढणार आहेत. ते १६ सप्टेंबरला फोर स्टार हॉटेलात ३२ हजार रूपये किराया असलेल्या आलिशान सूटमध्ये राहतील अशी माहिती मिळत आहे.
हेही वाचा…“सरसकट मराठ्यांना कुणबी दाखले देण्याचा नारायण राणेंचा विरोध, म्हणाले..,”
दरम्यान, सुभेदारी विश्रामगृह अपूरे पडेल. तसेच मंत्रिमंडळ बैठक विभागीय आयुक्तालयाऐवजी स्मार्ट सिटी कार्यालयात होणार आहे. शिवाय सुरक्षा व्यवस्थेमुळेही मुक्काम स्थळात बदल केल्याची माहिती पालकमंत्री संदीपान भूमरे यांनी दिव्य मराठीशी बोलतांना दिली आहे. यामुले सुभेदारीवर यंदा मंत्रिमंडळ बैठकीच्या वेळी नेमही दिसणारे राजकीय कार्यकर्ते, अधिकाऱ्यांच्या धावपळीचे चित्र पाहण्यास मिळणार नाही.
हॉटेल, विश्रामगृहात किती खोल्यांचे बुकिंग
रामा – ३० (मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सर्व मंत्री)
ताज – ४० (सचिव)
अमरप्रीत – ७० (उपसचिव, खासगी सचिव, कक्ष अधिकारी)
अजंता अॅम्बेसेडर – ४० (उपसचिव, खासगी सचिव, कक्ष अधिकारी)
महसूल प्रबोधिनी – १०० – (सुरक्षा रक्षक, वाहनचालक)
पाटीदार भवन – १०० – (सुरक्षा रक्षक, वाहनचालक)
वाल्मी, सिंचन, महावितरण, सुभेदारी विश्रामगृहे – २० (इतर अधिकारी)
READ ALSO :
हेही वाचा…“घराणेशाहीतून भाजप झालीय भ्रष्टाचारी” भाजप मंत्र्यांच्या मुलीने लुटला १० कोटींचा निधी, राष्ट्रवादीची जोरदार टिका
हेही वाचा…पिंपरी-चिंचवड न्यायालयाच्या इमारत उभारणीला ‘गती’, पहिल्या टप्प्यात ४ मजली इमारत उभारणार : आमदार लांडगे
हेही वाचा…“निवडणुका जवळ आल्या, राम मंदिराची सुरक्षा वाढवा,” प्रकाश आंबेडकरांची मागणी
हेही वाचा…शिवसेना प्रकरणात ४१ याचिका दाखल, पुढील सुनावणी कधी ? अध्यक्षांनी सांगितल्या तारखा
हेही वाचा…“सगळ्यातून सरकार बोध घेईल अन् चॅनल्सचे माईक..,” राज ठाकरेंचा सरकारला खोचक टोला