मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर आज विधिमंडळात शिवसेना अपात्र आमदारांच्या याचिकेवर सुनावणी होत आहे. आज ठाकेर गटातील आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सुनावणी होत आहे. ठाकरे गटाकडून वकिल असीम सरोदे आणि देवदत्त कामत आपली बाजू मांडणार आहेत. त्यामुळे आजच्या सुनावणीकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. यातच आता पुढील सुनावणी कधी होईल? याचा याबाबत राहुल नार्वेकर यांनी भाष्य केलं आहे.
हेही वाचा…“दिलेला शब्द खरा ठरावा, नाहीतर गाठ मराठ्यांशी”, राष्ट्रवादीने एकनाथ शिंदेंना दिला इशारा
विधिमंडळात आज शिंदे गटाच्या बाजूने वकील अनिल सिंग बाजू मांडत आहेत. यातच आमदार अपात्रतेसंबंधी सुनावणीच्या दरम्यान चित्रीकरण करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तसेच गोंधळ घालणाऱ्यांवर कारवाई करण्याची ताकीद देण्यात आली आहे. यावेळी दोन्ही गटाच्या वकिलांना कागदपत्रे सादर करण्यासाठी दोन आठवड्यांचा वेळ देण्यात आला आहे. यातच गणेशोत्सव तोंडावर असल्याने हा वेळ वाढवून देण्यात आला आहे.
हेही वाचा…“तब्बल १७ दिवसानंतर जरांगे पाटलांनी उपोषण मागे घेतले”, फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “यापुढे आम्ही..,”
विधान भवनात आज महत्वाची सुनावणी झाली. दोन्ही वादी आणि प्रतिवाद्यांनी आपापली बाजू मांडली. दोघांच्याही वकिलांनी आपलं म्हणणं लेखी स्वरूपात सादर केलं. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी पुढील सुनावणीसाठी आठ दिवसांत म्हणजे २२ किंवा २३ सप्टेंबर आणि १० दिवसांनंतर २५ सप्टेंबर अशा दोन तारखा दिल्या आहेत. आज सुनावणी वेळी एकूण ४१ याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्या एकत्र करून आगामी दोन तारखांना त्यावर सुनावणी होईल. असं किशोर पाटील यांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“सगळ्यातून सरकार बोध घेईल अन् चॅनल्सचे माईक..,” राज ठाकरेंचा सरकारला खोचक टोला
हेही वाचा…“शेतकऱ्यांची योजना अन् ‘या’ भाजप मंत्र्यांची मुलगी योजनांची लाभार्थी, काॅंग्रेसचा हल्लाबोल
हेही वाचा…“सरसकट मराठ्यांना कुणबी दाखले देण्याचा नारायण राणेंचा विरोध, म्हणाले..,”
हेही वाचा…अजित पवारांचा फोटो पाहून सुप्रिया सुळे झाल्या भावूक, गुप्तेंच्या कार्यक्रमात सुळेंनी लावली हजेरी
हेही वाचा…“आरएसएसची पुण्यात बैठक, तीन शाळांना सुट्टी,” मुलांचे शैक्षणिक नुकसान कशासाठी? राष्ट्रवादीचा सवाल