पुणे : मराठा समाज आरक्षणासाठी बसलेल्या मनोज जरांगे पाटलांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्युस पाजून उपोषण मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी तब्बल १७ दिवसानंतर आपलं उपोषण मागे घेतलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक नेते अंतरवाली सराटी गावात दाखल झाले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांच्याकडे एक महिन्याचा वेळ मागितला आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असा विश्वास व्यक्त केला. याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी मुख्यमंत्र्यांना खोचक टोला हाणला आहे.
हेही वाचा…“ट्रीपल इंजिन सरकारला दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा डब्बा जड जातोय”, वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल
कालच्या पत्रकार परिषदेमधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यावरून त्यांच्यावर जोरदार टिका करण्यात आली. त्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन मराठा समाजाला आरक्षण मिळल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. असं आश्वासन दिलं. त्यावरून मनोज जरांगे पाटलांना मुख्यमंत्री शिंदेंनी दिलेला शब्द खरा असावा हीच देवाचरणी प्रार्थना आहे. नाहीतर आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं असा प्रकार नको, गाठ मराठ्यांशी आहे. असा इशाराही त्यांनी दिला.
हेही वाचा…मनोज जरांग्यांचं उपोषण मागे, एकनाथ शिंदेंनी जरांग्यांना कोणतं आश्वासन दिलं ?
दरम्यान, मागील काही सरकारमध्ये मराठा समाजाला १७ ते १८ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. पंरतु ते सर्वोच्च न्यायालयात टिकलं नाही. आता नव्याने मराठा आरक्षणासाठी समित्या नेमल्या आहेत. त्यांचा अहवाल येणारच आहे. यातच मागील काही वर्षात अतिशय शांततेच मराठा समाजाचे मोर्चे निघालेत. परंतु त्याला काही गालबोट लागले नाहीत. परंतु याठिकाणी अतिशय दुर्दैवी घटना घडली. आरक्षणावर काम सुरू आहे. त्यामुळे तुम्ही निवांत राहा. असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
मनोज जारांगे पाटलांना आज मुख्यमंत्री शिंदेंनी दिलेला शब्द खरा असावा हीच देवाचरणी प्रार्थना !
नाहीतर “आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं” असा प्रकार नको, गाठ मराठ्यांशी आहे.— Prashant Sudamrao Jagtap (@JagtapSpeaks) September 14, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“तब्बल १७ दिवसानंतर जरांगे पाटलांनी उपोषण मागे घेतले”, फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “यापुढे आम्ही..,”
हेही वाचा…संसदेच्या विशेष अधिवेशात ‘या’ विधेयकावर होणार चर्चा, 17 सप्टेंबर बोलवली सर्वपक्षीय बैठक, हालचाली सुरू
हेही वाचा…ठाकरे गटावर ‘शिंदे गट’ भारी पडणार, शिंदे गटाकडून ‘हा’ बडा वकिल युक्तिवाद करणार
हेही वाचा…शिवसेना अपात्र आमदारांच्या याचिकेवर सुनावणी सुरू, विधिमंडळाच्या सभागृहात शिंदे अन् ठाकरे गटात होणार वाकृयुद्ध ?
हेही वाचा…पुण्यात शिंदेंना मोठा धक्का, एकनाथ शिंदेंच्या ‘या’ कट्टर समर्थकाने दिला आपल्या पदाचा राजीनामा