जालना : मराठा समाज आरक्षणासाठी बसलेल्या मनोज जरांगे पाटलांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्युस पाजून उपोषण मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी तब्बल १७ दिवसानंतर आपलं उपोषण मागे घेतलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक नेते अंतरवाली सराटी गावात दाखल झाले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांच्याकडे एक महिन्याचा वेळ मागितला आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. असं म्हटलं.
हेही वाचा…“उद्धव ठाकरेंशी पंगा, यशोमती ठाकूरांसोबत वाद, नवनीत राणांचा संघर्ष अटळ”
मागच्या सरकारने देखील मराठा समाजाला आरक्षण दिलं. परंतु मराठा आरक्षण सुप्रिम कोर्टात टिकलं नाही. मराठा समाजाला आरक्षण देण्याची सरकारचीही भूमिका आहे. लाठीचार्जमध्ये गावकऱ्यांवरचे सर्व गुन्हे मागे घेणार आहे. याचसोबत कोणावरही अन्याय न करता मराठ्यांना आरक्षण देणार आहे. लाठीचार्जमधील दोषींचं तडकाफडकी निलंबन केलं आहे. एकनाथ शिंदेसुद्धा गरीब कुटुंबात जन्मलेला कार्यकर्ता आहे. माझ्या पोटात एक ओठावर एक असं नाही. रद्द झालेलं आरक्षण मराठा समाजाला देण्याची भूमिका असल्याचंही शिंदेंनी म्हटलं.
हेही वाचा…“खाजगी आयुष्यातलं मी..,” नितेश राणेंना इन्फ्लूएंझा व्हायरस डिटेक्ट झाला, काळजी घेण्याचं केलं आवाहन
दरम्यान, मागील काही सरकारमध्ये मराठा समाजाला १७ ते १८ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. पंरतु ते सर्वोच्च न्यायालयात टिकलं नाही. आता नव्याने मराठा आरक्षणासाठी समित्या नेमल्या आहेत. त्यांचा अहवाल येणारच आहे. यातच मागील काही वर्षात अतिशय शांततेच मराठा समाजाचे मोर्चे निघालेत. परंतु त्याला काही गालबोट लागले नाहीत. परंतु याठिकाणी अतिशय दुर्दैवी घटना घडली. आरक्षणावर काम सुरू आहे. त्यामुळे तुम्ही निवांत राहा. असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…धाडसी निर्णय घेण्याची मुख्यमंत्र्यांमध्ये क्षमता, “मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय शांत बसणार नाही,” मनोज जरांगे पाटील
हेही वाचा…मनोज जरांगे पाटलाचं उपोषण सुटलं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जरांग्यांना ज्युस पाजलं
हेही वाचा…वाद आणखी चिघळला..! राणांच्या विरोधात यशोमती ठाकूर १०० कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार
हेही वाचा…४८ मुस्लिम नेते सांभाळणार लोकसभा प्रचाराची जबाबदारी, निवडणुकीपुर्वीच भाजपचा आराखडा तयार
हेही वाचा…फडणवीसांवर टिका, भाजप आक्रमक, शिंदे गटाच्या नेत्या म्हणाल्या “उद्धव ठाकरेंनीही तसं करावं”