अमरावती : मागील काही दिवसापासून खासदार नवनीत राणा आणि काॅंग्रेसच्या नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्यात राजकीय संघर्ष वाढला आहे. निवडणुकीत माझ्याकडून पैसे घेतले, परंतु सहकार्य केलं नाही. तसेच दुसऱ्या आमदारांच्या चपला उचलण्याचं काम करतात. अशी टिका नवनीत राणा यांनी यशोमती ठाकूर यांच्यावर केली आहे. त्यावर आता यशोमती ठाकूर यांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे. त्यामुळे अमरावतीत राणा विरूद्ध ठाकूर असा संघर्ष पेटला आहे.
हेही वाचा…“अडचणीच्या प्रश्नांपासून पळवाट शोधणारे ‘नाकर्ते सरकार’ राज्याचा कारभार हाकताहेत”
२०१४ साली लोकसभेच्या निवडणुकीत नवनीत राणा पहिल्यांदाच मैदानात उतरल्या. त्यावेळी त्यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाली. त्यावेळी आघाडी धर्मपाळून यशोमती ठाकूर यांना नवनीत राणांना मदत केली. यातच पुढच्या निवडणुकीत नवनीत राणांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला, परंतु त्यांनी राष्ट्रवादीचा पाठिंबा मागितला. त्यावेळीही यशोमती ठाकूर यांनी राणांना मदत केली. नवनीत राणा यांच्या विजयात यशोमती ठाकूर यांचा मोठा वाटा आहे. त्यानंतर त्यांनी भाजपला आपला पाठिंबा जाहीर केल्यानंतर ठाकूर विरूद्ध राणा असा वाद सुरू झाला.
हेही वाचा…“रोहित पवारांची अजित पवारांवर टिका,” अजित पवारांचा ‘हा’ भिडू थेट रोहित पवारांशी भिडला
2019 च्या निवडणुकीत नवनीत राणांनी भाजपला पाठिंबा दिला, अन् त्यानंतर महाविकास आघाडीच्या विरोधात राणांनी मोर्चा काढला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतांना नवनीत राणांना अटक झाल्यानंतर त्या यशोमती ठाकूर यांच्याविरोधात आक्रमक झाल्या. परंतु ठाकूर यांच्याविरोधात आक्रमक होण्याची कारण नवनीत राणा यांच्याकडे वेगळी आहेत. कारण अमरावती जिल्ह्यात काॅंग्रेसचं नेतृत्व ठाकूर यांच्याकडे असून त्यांचा जिल्ह्यातील सहकारी संस्थामध्ये दबदबा आहे. यातच पालकमंत्री पदाच्या काळात यशोमती ठाकूर यांचं पारड जड झालं. त्यामुळे आगामी काळात नवनीत राणांना पराभावाची भिती वाटू लागली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
हेही वाचा…आघाडीत बिघाडी…! रावेत लोकसभा मतदारसंघावरून राष्ट्रवादी अन् काॅंग्रेसमध्ये जुंपली
दरम्यान, नवनीत राणांच्या विरोधात महायुतीतील अपक्ष आमदार बच्चू कडू, शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि आता काॅंग्रेस विरोधात गेल्याने मोठा संघर्ष करावा लागण्याची शक्यता आहे. यातच आता आगामी निवडणुकांमध्ये महायुती नवनीत राणांना मदत करणार का ? त्याकडेही लक्ष लागून राहिलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“खाजगी आयुष्यातलं मी..,” नितेश राणेंना इन्फ्लूएंझा व्हायरस डिटेक्ट झाला, काळजी घेण्याचं केलं आवाहन
हेही वाचा…“राज्यातील शेती तोट्यात, निम्मा महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेखाली,” सरकार दुष्काळ का जाहीर करीत नाही?
हेही वाचा…“संभाजी भिडे उपोषणाच्या ठिकाणांहून अजित पवारांच्या काळजात घुसून आले”
हेही वाचा…अजित पवारांनी पुण्यासाठी स्पेशल घेतली मॅरेथॉन बैठक, आगामी निवडणुकीसाठी खास तयारी
हेही वाचा…व्हायरल झालेल्या ‘त्या’ व्हिडीओबाबत शिंदेंचं स्पष्टीकरण, म्हणाले, “त्यावेळीचा माईकवरील संवाद हा…,”