मुंबई :- मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत असतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. मराठा आरक्षणासंदर्भात सर्वपक्षीय नेत्यांची पत्रकार परिषद होणार होती. पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी आपण बोलून मोकळं व्हायचं असं एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं. त्यांचा हा व्हिडीओ प्रंचड व्हायरल झाला आहे. त्यावरून आता राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
हेही वाचा…“धनगर आणि मराठा समाजाला आरक्षण देऊ म्हणणारे फडणवीस आता का आरक्षण देत नाहीत ?”
विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्रकार परिषदेचा व्हिडीओ ट्विट केला आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, सरकारला फक्त बोलून मोकळं व्हायचं आहे. जनतेच्या प्रश्नांना-सम्यांना उत्तरे द्यायचे नाही. अडचणीच्या प्रश्नांपासून पळवाट शोधणारे नाकर्ते सरकार राज्याचा कारभार हाकत आहे. असा हल्लाबोलही त्यांनी केलाय.
हेही वाचा…महायुतीतल समन्वय समितीची बैठकीत मोठा निर्णय, महाविकास आघाडीविरूद्ध रणशिंग फुंकलं
दरम्यान, मराठा आरक्षणासाठी काल रात्री सर्वपक्षीय बैठक झाल्यानंतर पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी सरकारमधील या तीन प्रमुख नेत्यांतील संवाद तरी पाहा. “आपण बोलून मोकळं व्हायचं” हे त्यांचे उद्गार मराठा आरक्षण प्रश्नी त्यांची असलेली अनास्था दर्शवित आहे. मराठा आरक्षणासाठी सर्व समाजबांधव पोटतिडकीने राज्यभर आंदोलन करीत आहेत. अनेकांनी अन्नत्याग केला आहे. विविध माध्यमातून राज्य सरकारला जागे करण्याचा प्रयत्न आपला मराठा तरुण करताना दिसतो आहे. तरीही हे सरकार केवळ वेळकाढूपणा करीत आहे. अस खासदार ओमप्रकाशराजे निंबाळकर यांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“रोहित पवारांची अजित पवारांवर टिका,” अजित पवारांचा ‘हा’ भिडू थेट रोहित पवारांशी भिडला
हेही वाचा…आघाडीत बिघाडी…! रावेत लोकसभा मतदारसंघावरून राष्ट्रवादी अन् काॅंग्रेसमध्ये जुंपली
हेही वाचा…“राज्यात आरक्षण समाप्ती ? मागारवर्गीय जागे व्हा..!” जितेंद्र आव्हाडांचं मोठं आवाहन
हेही वाचा…“आरक्षण देण्याची दानत नसेल तर सांगा पण..,” शिंदेंच्या ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, ठाकरे गटाची टिका
हेही वाचा…“सरकारी कर्मचाऱ्यांच्या भरत्या आता कंत्राटी पद्धतीने,” खासदार अमोल कोल्हे सरकारवर भडकले