पुणे : थेट सरकारी भरतीला पर्याय म्हणून राज्य सरकारने कंत्राटी भरतीच्या कक्षा आणखी रूंदावल्या आहेत. अधिकाऱ्यासह सर्व कार्यालयातील सरकारी पदं आता कंत्राटी असणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात राजकीय नेत्यांनी कडाडून विरोध केला आहे. अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या संदर्भात राज्य सरकारने आठ कंपन्याना ठेका दिल्याची माहिती समोर आली आहे. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार यांनी राज्य सरकारवर टिका केली आहे. त्यावर आता अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
हेही वाचा…महायुतीतल समन्वय समितीची बैठकीत मोठा निर्णय, महाविकास आघाडीविरूद्ध रणशिंग फुंकलं
रोहित पवार म्हणाले की, “एका सरकारी कर्मचाऱ्याच्या पगारात तीन कंत्राटी कर्मचारी काम करतील या आशयाचे एका बड्या नेत्याचे वक्तव्य ऐकूण व बदलती भूमिका बघून आश्चर्य वाटले. याच दृष्टीने विचार केला तर एका आमदारावर, खासदारावर होणाऱ्या करोडो रुपयांच्या शासकीय खर्चात हजारो कर्मचारी काम करतील. बंडखोर आमदारांच्या सुरक्षेवर १५० कोटी खर्चासाठी, शासन आपल्या दारी च्या एकेका सभेसाठी ८-१० कोटी व त्याच्या जाहिरातीवर ५२ कोटी, सरकारने गेल्या वर्षी केलेल्या कामांची यावर्षी जाहिरात करण्यासाठी शेकडो कोटी खर्च करताना काटकसर करावी, असा विचार शासन कधी करत नाही.”
हेही वाचा…निवडणुकांसाठी ठाकरेंचा मेगा प्लॅन, ‘होऊ दे चर्चा’च्या उपक्रमातून मोदींवर हल्लाबोल, पहिलाच कार्यक्रम बारामतीत
पुढे बोलतांना ते म्हणाले की, शासकीय खर्चाची उधळमाप शासनाला चालते. मग नोकर भरती साठीच शासन एवढा बारीक विचार का करते? सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांकडून परीक्षा फीच्या माध्यमातून हजारो कोटींची वसुली करूनही पारदर्शक परीक्षा न घेऊ शकलेले सरकार प्रायव्हेट कंपन्यांना फायदा देण्यासाठी आज कंत्राटी भरतीसाठी जीआर काढत आहेत. केंद्र सरकार प्रमाणे कंत्राटी भरतीचे गुणगान गात आहे. सरकारला कंत्राटी भरती ची एवढीच हौस असेल तर राज्य सरकारच कंपनीला कंत्राटी पद्धतीने चालवायला द्या.
हेही वाचा…“शरद पवारांना बाप म्हणणारे आता मोदींना बाप समजतात”, काॅंग्रेसच्या आमदारानी रवी राणांना दाखवला कात्रजचा घाट
दरम्यान, रोहित पवारांनी केलेल्या टिकेला अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. दादा आपण लहान आणि नवखे आहोत अजून राजकारणात. ज्यांच्याविरूद्ध आपण बोलत आहात त्यांनी आपल्यापेक्षा अनेक उन्हाळे पावसाळे जास्त पाहिलेले आहेत. सत्तेत सहभागी होताना सर्वप्रथम समर्थन आपलेच होते, याचा मी स्वत; साक्षीदार आहे. आता सरकारला सरकारचे काम करू द्या, आणि स्वत: ला सावरा असा टोला मिटकरी यांनी रोहित पवारांना लगावला.
दादा आपण लहान आणि नवखे आहोत अजुन राजकारणात! ज्यांच्याविरुद्ध आपण बोलत आहात त्यांनी आपल्यापेक्षा अनेक उन्हाळे पावसाळे जास्त पाहिलेले आहेत. सत्तेत सहभागी होताना सर्वप्रथम समर्थन आपलेच होते याचा मी स्वतः साक्षीदार आहे.आता सरकारला सरकारचे काम करू द्या. आणि स्वतःला सावरा. https://t.co/fzMHzzTaME
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) September 12, 2023
READ ALSO :
हेही वाचा…आघाडीत बिघाडी…! रावेत लोकसभा मतदारसंघावरून राष्ट्रवादी अन् काॅंग्रेसमध्ये जुंपली
हेही वाचा…“राज्यात आरक्षण समाप्ती ? मागारवर्गीय जागे व्हा..!” जितेंद्र आव्हाडांचं मोठं आवाहन
हेही वाचा…“आरक्षण देण्याची दानत नसेल तर सांगा पण..,” शिंदेंच्या ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, ठाकरे गटाची टिका
हेही वाचा…“सरकारी कर्मचाऱ्यांच्या भरत्या आता कंत्राटी पद्धतीने,” खासदार अमोल कोल्हे सरकारवर भडकले
हेही वाचा…“धनगर आणि मराठा समाजाला आरक्षण देऊ म्हणणारे फडणवीस आता का आरक्षण देत नाहीत ?”