अमरावती : महायुतीतील अपक्ष आमदार रवी राणा मागील काही दिवसापासून सातत्याने चर्चेत आले आहेत. यातच त्यांनी काॅंग्रेसचे आमदार बळवंत वानखेडे यांच्यावर अगदी खालच्या पातळीवर जाऊन टिका केली आहे. दर्यापूरचे आमदार तिवसा मतदारसंघातील आमदारांच्या म्हणजेच यशोमती ठाकूर यांच्या चपला उचलण्याचं काम करतात अशी खोचक टिका रवी राणा यांनी केली होती. त्यावर आता बळवंत वानखेडे यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
हेही वाचा…“सगळे पक्ष एकमेकांची चामडी सोलत बसले नसते तर..,” वंचितच्या रेखा ठाकूर यांची जोरदार टिका
बडनेराच्या आमदारांनी मला स्वाभिमान शिकवण्याची गरज नाही, मी फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांचा वारसदार आहे. स्वाभिमान माझ्या रक्तात आहे. काॅंग्रेस- राष्ट्रवादीच्या भरवशावर निवडून आले. शरद पवारांना बाप म्हणणारे मोदींना बाप समजत आहेत. जात प्रमाणपत्र वाचवण्यासाठी मोदी-शाहांच्या मांडीवर जाऊन बसले असा घणाघात त्यांनी रवी राणा यांच्यावर केला आहे.
हेही वाचा..“सरकार आपल्यासमोर झुकले”, मनोज जरांगे पाटील उपोषण मागे घेणार?
दरम्यान, दर्यापूरचे आमदार तिवसा मतदारसंघातील आमदारांच्या चपला उचलण्याचं काम करतात. जनतेनं आमदार बनवलं आहे. पण चपला कोणाच्या उचलता? नेत्यांच्या खूर्चीला लाथ मारून काम करण्याची ताकद असली पाहिजे. त्याला मर्द आमदार म्हणातात. असं रवी राणा यांनी म्हटलं होतं.
READ ALSO :
हेही वाचा…“पैशाच्या जोरावर राजकीय पक्ष फोडणं भाजपचं काम,” बाळासाहेब थोरतांची भाजपवर जोरदार टिका
हेही वाचा..भर पत्रकार परिषद चित्रा वाघांनी आणला विदूषक, ठाकरेंवर केला हल्लाबोल
हेही वाचा…भाजपने वंचितची मोठी फौज फोडली, असंख्य कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल, जोरदार राजकीय हालचाली सुरू
हेही वाचा…शरद पवार गटाकडून धनंजय मुंडेंवर जहरी टिका, म्हणाले…,
हेही वाचा…मनोज जरांगे पाटलांच्या सरकारला कडक ‘या’ पाच अटी, नाहीतर दिला अजून एक इशारा