मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यात राष्ट्रवादीच्या ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये धनंजय मुंडे यांना कृषी खातं देण्यात आलं. यातच आता राज्यात मागील काही दिवसापासून पाऊस न झाल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. अनेक ठिकाणी उभं पिकं वाळून गेली आहे. यातच काल संभाजीनगरमध्ये तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. यावरून आता राज्य सरकारवर जोरदार टिका केली जात आहे.
हेही वाचा…तीन दिवसांत मंत्रिमंडळाचा विस्तार, आज महायुतीच्या समन्वय समितीची महत्वाची बैठक
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सभेला प्रत्युत्तर म्हणून अजित पवार गटाची कोल्हापुरात सभा झाली. यावरून आता राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे यांच्यावर टिका केली जात आहे. सत्तेवर येताच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ‘शेतकरी आत्महत्या मुक्त राज्य’ करणार असल्याची घोषणा केली होती. मात्र त्यांची ही घोषणा फोल ठरत असतानाच त्यांच्याच मंत्री मंडळातील कृषि मंत्र्यांच्या जिल्ह्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्यांची नोंद होणे हे वेदनादायक आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी व त्यांना मानसिक आणि आर्थिक धीर देण्यासाठी राज्य सरकारने ठोस उपाययोजना कराव्यात.
हेही वाचा…उद्धव ठाकरे आणि भास्कर जाधवांची नीच…”, भाजपा आमदाराकडून बोचरी टीका
दरम्यान, महाराष्ट्रातील मराठवाड्यात ०१ जानेवारी २०२३ पासून ते ३१ ऑगस्ट २०२३ पर्यंत सुमारे ६८५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं भीषण वास्तव समोर आलं आहे. त्यापैकी सर्वाधिक १८६ आत्महत्या हे राज्याच्या कृषि मंत्र्यांच्या जिल्ह्यात झाले असल्याचे एका अहवालातून स्पष्ट झाले आहे.
महाराष्ट्रातील मराठवाड्यात ०१ जानेवारी २०२३ पासून ते ३१ ऑगस्ट २०२३ पर्यंत सुमारे ६८५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं भीषण वास्तव समोर आलं आहे. त्यापैकी सर्वाधिक १८६ आत्महत्या हे राज्याच्या कृषि मंत्र्यांच्या जिल्ह्यात झाले असल्याचे एका अहवालातून स्पष्ट झाले आहे.
सत्तेवर येताच…
— NCP (@NCPspeaks) September 12, 2023
READ ALSO :
हेही वाचा…मनोज जरांगे पाटलांच्या सरकारला कडक ‘या’ पाच अटी, नाहीतर दिला अजून एक इशारा
हेही वाचा…“सगळे पक्ष एकमेकांची चामडी सोलत बसले नसते तर..,” वंचितच्या रेखा ठाकूर यांची जोरदार टिका
हेही वाचा..“सरकार आपल्यासमोर झुकले”, मनोज जरांगे पाटील उपोषण मागे घेणार?
हेही वाचा…“शिवकार्यात शिवजन्मभूमीचा मावळा म्हणून..,”अमोल कोल्हेंनी शरद सोनवणे यांना दिला पाठिंबा
हेही वाचा…शिवजन्मभूमीचा डंका जगभरात वाजणार, शिवछत्रपतींचा जगातील सर्वात मोठा पुतळा जुन्नरमध्ये उभारला जाणार