मुंबई : आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक जण पक्ष प्रवेश करतांना दिसत आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर मागील काही महिन्यापासून राज्यात अनेक जणांनी पक्ष प्रवेश केला आहे. यातच आता बहुजन समाज पार्टीतील असंख्य कार्यकात्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
हेही वाचा…शिवजन्मभूमीचा डंका जगभरात वाजणार, शिवछत्रपतींचा जगातील सर्वात मोठा पुतळा जुन्नरमध्ये उभारला जाणार
भाजपच्या मुंबईतील कार्यालयात आज मोठा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते संजय भोसले, बहुजन समाज पार्टीचे मुंबई उपाध्यक्ष अॅड. प्रदीप शिरसाट, आरपीआयचे (खोरिपा) विद्यार्थी नेते पंकज चाबुरजर, रिपाईचे माथाडी नेते प्रकाश सोलिया, अॅड. गोरख उबाळे, शबाना शेख, वनिता जाधव, मनीषा चव्हाण, सुजाता कांबळे, दीपक पवार, कोल्हापूर येथील अखिल महाराष्ट्र राज्य घडशी समाजाचे कार्याध्यक्ष शिवाजी कदम, पुणे जिल्हा अध्यक्ष घनश्याम मोरे, अहमदनगर येथील घडशी समाजाचे राज्य सचिव अशोक काळे, सातारा येथील घडशी समाजाचे राज्य संघटक सुनील वाडेकर, मुंबईच्या किरण जाधव, जगन्नाथ पवार, मंगेश पवार, प्रदीप वाडेकर, प्रशांत साळुंके, राष्ट्रीय समाज पक्षाचे अलिबाग जिल्हाध्यक्ष दयानंद खरात, काकासो कर्णवार, विनोद पोकळे, सागर येळे, रासपचे दौंड तालुका अध्यक्ष किसनराव हंडाळ यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला.
हेही वाचा…तीन दिवसांत मंत्रिमंडळाचा विस्तार, आज महायुतीच्या समन्वय समितीची महत्वाची बैठक
दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीत सामील होण्याची निर्णय घेतल्यानंतर राजकीय समीकरण बदलली आहेत. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस मिळून आगामी निवडणुका लढण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट, आणि काॅंग्रेस मिळून महाविकास आघाडी एकत्रित निवडणुका लढण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे आगामी काळातील राजकीय वातावरण चांगलचं तापण्याची शक्यता आहे.
मुंबई प्रदेश कार्यालयात वंचित बहुजन आघाडीचे नेते संजय भोसले, बहुजन समाज पार्टीचे मुंबई उपाध्यक्ष अॅड. प्रदीप शिरसाट, आरपीआयचे (खोरिपा) विद्यार्थी नेते पंकज चाबुरजर, रिपाईचे माथाडी नेते प्रकाश सोलिया, अॅड. गोरख उबाळे, शबाना शेख, वनिता जाधव, मनीषा चव्हाण, सुजाता कांबळे, दीपक पवार,… pic.twitter.com/jo43Lb0iNI
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) September 12, 2023
READ ALSO :
हेही वाचा…शरद पवार गटाकडून धनंजय मुंडेंवर जहरी टिका, म्हणाले…,
हेही वाचा…मनोज जरांगे पाटलांच्या सरकारला कडक ‘या’ पाच अटी, नाहीतर दिला अजून एक इशारा
हेही वाचा…“सगळे पक्ष एकमेकांची चामडी सोलत बसले नसते तर..,” वंचितच्या रेखा ठाकूर यांची जोरदार टिका
हेही वाचा..“सरकार आपल्यासमोर झुकले”, मनोज जरांगे पाटील उपोषण मागे घेणार?
हेही वाचा…“शिवकार्यात शिवजन्मभूमीचा मावळा म्हणून..,”अमोल कोल्हेंनी शरद सोनवणे यांना दिला पाठिंबा