पुणे :- थेट सरकारी भरतीला पर्याय म्हणून राज्य सरकारने कंत्राटी भरतीच्या कक्षा आणखी रूंदावल्या आहेत. अधिकाऱ्यासह सर्व कार्यालयातील सरकारी पदं आता कंत्राटी असणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात राजकीय नेत्यांनी कडाडून विरोध केला आहे. अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या संदर्भात राज्य सरकारने आठ कंपन्याना ठेका दिल्याची माहिती समोर आली आहे. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी राज्य सरकारने जोरदार टीका केली आहे.
हेही वाचा…भर पत्रकार परिषद चित्रा वाघांनी आणला विदूषक, ठाकरेंवर केला हल्लाबोल
सरकारकडून हा खासगीकरणाचा घाट कुणासाठी घातला जातोय? सरकार सर्वसामान्य जनतेऐवजी मोठमोठ्या उद्योगपतींना केंद्रस्थानी ठेवून धोरण आखतय का? सरकारी नोकर भरतीमधील बहुजन समाजाचं आरक्षण संपवण्याचा हा डाव आहे का? असा सवाल करीत अमोल कोल्हे यांनी सरकारच्या विरोधात हल्लबोल केला आहे. सामाजिक हित जपण्यात सरकार सपशेल अपयशी ठरलं असल्याचंही म्हटलं आहे.
हेही वाचा…भाजपने वंचितची मोठी फौज फोडली, असंख्य कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल, जोरदार राजकीय हालचाली सुरू
दरम्यान, राज्य सरकारने 9 खासगी कंपन्यांकडून इंजिनिअर, व्यवस्थापक, संशोधक, अधीक्षक सारख्या 150 हुन अधिक पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. हजारोंच्या या भरतीचे संपूर्ण अधिकार या कंपन्यांना दिलेत, त्यातील काही कंपन्या या परराज्यातील आहेत. वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षांसाठी मेहनत करून सरकारी नोकरी मिळवण्याच्या सर्वसामान्य तरूणांच्या आशा धुळीला मिळवण्याचा हा निर्णय आहे. असंही त्यांनी म्हटलं आहे.
📌 सरकारकडून हा खासगीकरणाचा घाट कुणासाठी घातला जातोय?
📌 सरकार सर्वसामान्य जनतेऐवजी मोठमोठ्या उद्योगपतींना केंद्रस्थानी ठेवून धोरण आखतय का?
📌 सरकारी नोकर भरतीमधील बहुजन समाजाचं आरक्षण संपवण्याचा हा डाव आहे का?
📌 सामाजिक हित जपण्यात सरकार सपशेल अपयशी ठरलं आहे.राज्य सरकारने 9…
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) September 13, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“धनगर आणि मराठा समाजाला आरक्षण देऊ म्हणणारे फडणवीस आता का आरक्षण देत नाहीत ?”
हेही वाचा…महायुतीतल समन्वय समितीची बैठकीत मोठा निर्णय, महाविकास आघाडीविरूद्ध रणशिंग फुंकलं
हेही वाचा…निवडणुकांसाठी ठाकरेंचा मेगा प्लॅन, ‘होऊ दे चर्चा’च्या उपक्रमातून मोदींवर हल्लाबोल, पहिलाच कार्यक्रम बारामतीत
हेही वाचा…“शरद पवारांना बाप म्हणणारे आता मोदींना बाप समजतात”, काॅंग्रेसच्या आमदारानी रवी राणांना दाखवला कात्रजचा घाट
हेही वाचा…“पैशाच्या जोरावर राजकीय पक्ष फोडणं भाजपचं काम,” बाळासाहेब थोरतांची भाजपवर जोरदार टिका