मुंबई :- मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत असतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. मराठा आरक्षणासंदर्भात सर्वपक्षीय नेत्यांची पत्रकार परिषद होणार होती. पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी आपण बोलून मोकळं व्हायचं असं एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं. त्यांचा हा व्हिडीओ प्रंचड व्हायरल झाला आहे. त्यावरून आता शिवसेनेचे खासदार ओमप्रकाशराजे निंबाळकर यांनी शिंदेंवर निशाणा साधला आहे.
हेही वाचा…“पैशाच्या जोरावर राजकीय पक्ष फोडणं भाजपचं काम,” बाळासाहेब थोरतांची भाजपवर जोरदार टिका
मराठा आरक्षणासाठी काल रात्री सर्वपक्षीय बैठक झाल्यानंतर पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी सरकारमधील या तीन प्रमुख नेत्यांतील संवाद तरी पाहा. “आपण बोलून मोकळं व्हायचं” हे त्यांचे उद्गार मराठा आरक्षण प्रश्नी त्यांची असलेली अनास्था दर्शवित आहे. मराठा आरक्षणासाठी सर्व समाजबांधव पोटतिडकीने राज्यभर आंदोलन करीत आहेत. अनेकांनी अन्नत्याग केला आहे. विविध माध्यमातून राज्य सरकारला जागे करण्याचा प्रयत्न आपला मराठा तरुण करताना दिसतो आहे. तरीही हे सरकार केवळ वेळकाढूपणा करीत आहे. अस खासदार ओमप्रकाशराजे निंबाळकर यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…भर पत्रकार परिषद चित्रा वाघांनी आणला विदूषक, ठाकरेंवर केला हल्लाबोल
एकीकडे समाज जीवन मरणाचा संघर्ष शांततेच्या माध्यमातून करीत असताना सरकारचे हे ट्रीपल इंजिन बघा किती गांभीर्याने हा विषय घेत आहेत.. आरक्षण देण्याची दानत नसेल तर तसे सांगा पण, किमान जखमेवर मीठ तरी चोळू नका. समाज आता तुमच्याकडे डोळसपणे बघतोय. अशी टिकाही त्यांनी केलीय.
मराठा आरक्षणासाठी काल रात्री सर्वपक्षीय बैठक झाल्यानंतर पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी सरकारमधील या तीन प्रमुख नेत्यांतील संवाद तरी पाहा. “आपण बोलून मोकळं व्हायचं” हे त्यांचे उद्गार मराठा आरक्षण प्रश्नी त्यांची असलेली अनास्था दर्शवित आहे.
मराठा आरक्षणासाठी सर्व समाजबांधव… pic.twitter.com/172MQ4cxXH
— Omprakash Rajenimbalkar (@OmRajenimbalkr) September 12, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“सरकारी कर्मचाऱ्यांच्या भरत्या आता कंत्राटी पद्धतीने,” खासदार अमोल कोल्हे सरकारवर भडकले
हेही वाचा…“धनगर आणि मराठा समाजाला आरक्षण देऊ म्हणणारे फडणवीस आता का आरक्षण देत नाहीत ?”
हेही वाचा…महायुतीतल समन्वय समितीची बैठकीत मोठा निर्णय, महाविकास आघाडीविरूद्ध रणशिंग फुंकलं
हेही वाचा…निवडणुकांसाठी ठाकरेंचा मेगा प्लॅन, ‘होऊ दे चर्चा’च्या उपक्रमातून मोदींवर हल्लाबोल, पहिलाच कार्यक्रम बारामतीत
हेही वाचा…“शरद पवारांना बाप म्हणणारे आता मोदींना बाप समजतात”, काॅंग्रेसच्या आमदारानी रवी राणांना दाखवला कात्रजचा घाट