मुंबई :- मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत असतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. मराठा आरक्षणासंदर्भात सर्वपक्षीय नेत्यांची पत्रकार परिषद होणार होती. पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी आपण बोलून मोकळं व्हायचं असं एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं. त्यांचा हा व्हिडीओ प्रंचड व्हायरल झाला आहे. त्यावरून आता राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. त्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपलं स्पष्टीकरण दिलं आहे.
हेही वाचा…“सरकारी कर्मचाऱ्यांच्या भरत्या आता कंत्राटी पद्धतीने,” खासदार अमोल कोल्हे सरकारवर भडकले
एकनाथ शिंदे म्हणाले की, मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीनंतर सह्याद्री अतिथिगृह येथे पत्रकार परिषदेपूर्वी आपला आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचा माईकवरील संवाद ‘सोशल मीडीया’वरून चुकीच्या पध्दतीने संपादित करुन फिरविणे अत्यंत खोडसाळपणाचे आहे. मराठा आरक्षणाबाबत सरकार सुरुवातीपासून संवेदनशील असून कायद्याच्या चौकटीत बसेल असे आरक्षण देण्याबाबत सरकार प्राधान्याने काम करीत आहे. तसेच मराठा आरक्षणाबाबत पहिल्यांदाच अशा सर्व पक्षांच्या नेत्यांना एकत्र बोलावून या विषयी त्यांचे एकमत घेण्यात आले आहे.
हेही वाचा…“धनगर आणि मराठा समाजाला आरक्षण देऊ म्हणणारे फडणवीस आता का आरक्षण देत नाहीत ?”
पुढे बोलतांना त्यांनी सांगितले की, शासनाने इतकी चांगली भूमिका घेतली असतांना मुद्दामहून काही विरोधक खोडसाळपणे आणि व्हिडीओ क्लिप चुकीच्या पद्धतीने संपादित करून लोकांच्या मनात गैरसमज पसरविण्याचे काम करीत आहेत हे अतिशय निंदनीय आहे. आमच्या एकमेकांमधील संवादाची मोडतोड करून संपादित करून दाखवून या घटकांनी जाणीवपूर्वक निंदनीय कृत्य केले आहे. शासन एकीकडे या संवेदनशील विषयावर ठोस भूमिका आणि निर्णय घेत आहे. अशा पार्श्वभूमीवर समाजात सोशल मीडियातून गैरसमज निर्माण करण्याचा कृत्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे.
सरकारला फक्त बोलून मोकळं व्हायचं आहे.
जनतेच्या प्रश्नांना- समस्यांना उत्तरे द्यायचे नाही.अडचणीच्या प्रश्नांपासून पळवाट शोधणारे “नाकर्ते सरकार” राज्याचा कारभार हाकत आहे. pic.twitter.com/lWpAuIT1s1
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) September 13, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“अडचणीच्या प्रश्नांपासून पळवाट शोधणारे ‘नाकर्ते सरकार’ राज्याचा कारभार हाकताहेत”
हेही वाचा…“रोहित पवारांची अजित पवारांवर टिका,” अजित पवारांचा ‘हा’ भिडू थेट रोहित पवारांशी भिडला
हेही वाचा…आघाडीत बिघाडी…! रावेत लोकसभा मतदारसंघावरून राष्ट्रवादी अन् काॅंग्रेसमध्ये जुंपली
हेही वाचा…“राज्यात आरक्षण समाप्ती ? मागारवर्गीय जागे व्हा..!” जितेंद्र आव्हाडांचं मोठं आवाहन
हेही वाचा…“आरक्षण देण्याची दानत नसेल तर सांगा पण..,” शिंदेंच्या ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, ठाकरे गटाची टिका