मुंबई : मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटलांची अलिकडेच संभाजी भिडे यांनी भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री यांचं कौतूक करत हे तिन्ही नेते तुम्हाला न्याय देतील, त्यामुळे तुम्ही उपोषण मागे घ्या, असं संभाजी भिडे यांनी मनोज जरांगेंना सांगितलं. त्यावरून आता राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी खोचक टिप्पणी केली.
हेही वाचा…“राज्यात आरक्षण समाप्ती ? मागारवर्गीय जागे व्हा..!” जितेंद्र आव्हाडांचं मोठं आवाहन
काल गुरूजींना त्यांना प्रमाणपत्र दिलं आहे, त्यांच्या शिष्यांना प्रमाणपत्र दिलं गेलंय. ते तुमची फसवणूक करणार नाहीत. असं गुरूजी मनोज जरांगे यांना म्हणाले. त्यांच्यावर विश्वास ठेवा असंही म्हणाले. आधी शिष्यांनी गुरूजींवर आणि मग लोकांनी शिष्यांवर विश्वास ठेवावा म्हणून गुरूजी त्यांची वकिली करायला गेले होते. त्यापलिकडे जाऊन गुरूजी हे अजित पवारांच्या काळजात घुसून आले. हे काळजीचे लोक आहेत, असं प्रमाणपत्रही दिलं आहे. हा भिडे गुरूजी सरकारसाठी सांगकाम्याचं काम करतो का यांचं लोकांना काल उत्तर मिळालं असल्याचा खोचक टोला वडेट्टीवारांनी हाणला.
हेही वाचा…“आरक्षण देण्याची दानत नसेल तर सांगा पण..,” शिंदेंच्या ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, ठाकरे गटाची टिका
दरम्यान, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतलीच पाहिजे. त्याचबरोबर ओबीसी समाजाचे अनेक तरूण आमरण उपोषणाला बसले आहेत, तिथेही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी जावं, त्यांचं उपोषण सोडवावं. असंही सरकारला काही काम उरलेलं नाही. त्यांना शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आणि उपोषण सोडवणं एवढचं काम उरलंय असल्याची टिकाही त्यांनी केलीय.
READ ALSO :
हेही वाचा…अजित पवारांनी पुण्यासाठी स्पेशल घेतली मॅरेथॉन बैठक, आगामी निवडणुकीसाठी खास तयारी
हेही वाचा…व्हायरल झालेल्या ‘त्या’ व्हिडीओबाबत शिंदेंचं स्पष्टीकरण, म्हणाले, “त्यावेळीचा माईकवरील संवाद हा…,”
हेही वाचा…“अडचणीच्या प्रश्नांपासून पळवाट शोधणारे ‘नाकर्ते सरकार’ राज्याचा कारभार हाकताहेत”
हेही वाचा…“रोहित पवारांची अजित पवारांवर टिका,” अजित पवारांचा ‘हा’ भिडू थेट रोहित पवारांशी भिडला
हेही वाचा…आघाडीत बिघाडी…! रावेत लोकसभा मतदारसंघावरून राष्ट्रवादी अन् काॅंग्रेसमध्ये जुंपली