अमरावती : मागील काही दिवसापासून खासदार नवनीत राणा आणि आमदार आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्यातील वाद आणखी वाढत चालला आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी यशोमती ठाकूर यांनी कडक नोटा घेतल्या असल्याचा गंभीर आरोप नवनीत राणा यांनी केला होता. त्यावर आता यशोमती ठाकूर आक्रमक झाल्या असून नवनीत राणा यांच्याविरोधात अब्रूनुकसानीचा दावा ठोकरणार असल्याचं म्हटलं आहे.
हेही वाचा…“संभाजी भिडे उपोषणाच्या ठिकाणांहून अजित पवारांच्या काळजात घुसून आले”
लोकसभा निवडणुकीत माझ्याकडून पैसे घेतले, परंतु सहकार्य केलं नाही. तसेच दुसऱ्या आमदारांच्या चपला उचलण्याचं काम यशोमती ठाकूर करतात. अशी टिका नवनीत राणा यांनी यशोमती ठाकूर यांच्यावर केली. त्यावर आता यशोमती ठाकूर आक्रमक झाल्या असून नवनीत राणा यांच्याविरोधात १०० कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे यशोमती ठाकूर यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे आता हा वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…अजित पवारांनी पुण्यासाठी स्पेशल घेतली मॅरेथॉन बैठक, आगामी निवडणुकीसाठी खास तयारी
दरम्यान, २०१४ साली लोकसभेच्या निवडणुकीत नवनीत राणा पहिल्यांदाच मैदानात उतरल्या. त्यावेळी त्यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाली. त्यावेळी आघाडी धर्मपाळून यशोमती ठाकूर यांना नवनीत राणांना मदत केली. यातच पुढच्या निवडणुकीत नवनीत राणांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला, परंतु त्यांनी राष्ट्रवादीचा पाठिंबा मागितला. त्यावेळीही यशोमती ठाकूर यांनी राणांना मदत केली. नवनीत राणा यांच्या विजयात यशोमती ठाकूर यांचा मोठा वाटा आहे. त्यानंतर त्यांनी भाजपला आपला पाठिंबा जाहीर केल्यानंतर ठाकूर विरूद्ध राणा असा वाद सुरू झाला.
READ ALSO :
हेही वाचा…४८ मुस्लिम नेते सांभाळणार लोकसभा प्रचाराची जबाबदारी, निवडणुकीपुर्वीच भाजपचा आराखडा तयार
हेही वाचा…फडणवीसांवर टिका, भाजप आक्रमक, शिंदे गटाच्या नेत्या म्हणाल्या “उद्धव ठाकरेंनीही तसं करावं”
हेही वाचा…“उद्धव ठाकरेंशी पंगा, यशोमती ठाकूरांसोबत वाद, नवनीत राणांचा संघर्ष अटळ”
हेही वाचा…“खाजगी आयुष्यातलं मी..,” नितेश राणेंना इन्फ्लूएंझा व्हायरस डिटेक्ट झाला, काळजी घेण्याचं केलं आवाहन
हेही वाचा…“राज्यातील शेती तोट्यात, निम्मा महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेखाली,” सरकार दुष्काळ का जाहीर करीत नाही?