मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर आज विधिमंडळात शिवसेना अपात्र आमदारांच्या याचिकेवर सुनावणी होत आहे. आज ठाकेर गटातील आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सुनावणी होत आहे. ठाकरे गटाकडून वकिल असीम सरोदे आणि देवदत्त कामत आपली बाजू मांडणार आहेत. त्यामुळे आजच्या सुनावणीकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.
हेही वाचा…मनोज जरांगे पाटलाचं उपोषण सुटलं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जरांग्यांना ज्युस पाजलं
विधिमंडळात आज शिंदे गटाच्या बाजूने वकील अनिल सिंग बाजू मांडत आहेत. यातच आमदार अपात्रतेसंबंधी सुनावणीच्या दरम्यान चित्रीकरण करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तसेच गोंधळ घालणाऱ्यांवर कारवाई करण्याची ताकीद देण्यात आली आहे. यावेळी दोन्ही गटाच्या वकिलांना कागदपत्रे सादर करण्यासाठी दोन आठवड्यांचा वेळ देण्यात आला आहे. यातच गणेशोत्सव तोंडावर असल्याने हा वेळ वाढवून देण्यात आला आहे.
हेही वाचा…वाद आणखी चिघळला..! राणांच्या विरोधात यशोमती ठाकूर १०० कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार
दरम्यान, विधीमंडळात आज ठाकरे आणि शिंदे गटातील आमदार आज सुनावणीसाठी उपस्थित होते. यातच कागदपत्रांची देवाणघेवाण न झाल्याने दोन आठवड्यांचा वेळ वाढवून दिला आहे. त्यामुळे आता आगामी सुनावणी दोन आठवड्यानंतर होणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…शिवसेना अपात्र आमदारांच्या याचिकेवर सुनावणी सुरू, विधिमंडळाच्या सभागृहात शिंदे अन् ठाकरे गटात होणार वाकृयुद्ध ?
हेही वाचा…पुण्यात शिंदेंना मोठा धक्का, एकनाथ शिंदेंच्या ‘या’ कट्टर समर्थकाने दिला आपल्या पदाचा राजीनामा
हेही वाचा…“ट्रीपल इंजिन सरकारला दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा डब्बा जड जातोय”, वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल
हेही वाचा…मनोज जरांग्यांचं उपोषण मागे, एकनाथ शिंदेंनी जरांग्यांना कोणतं आश्वासन दिलं ?
हेही वाचा…धाडसी निर्णय घेण्याची मुख्यमंत्र्यांमध्ये क्षमता, “मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय शांत बसणार नाही,” मनोज जरांगे पाटील