पुणे : शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर विधीमंडळात सुनावणी घेत आहेत. सुनावणीच्या आधी ठाकरे गटातील आमदारांची बैठक पार पडली आहे. ठाकरे गटातर्फे वकील देवदत्त कामत आणि असी सरोदे बाजू मांडणार आहेत. त्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुण्यात मोठा झटका बसला आहे.
हेही वाचा…४८ मुस्लिम नेते सांभाळणार लोकसभा प्रचाराची जबाबदारी, निवडणुकीपुर्वीच भाजपचा आराखडा तयार
गेल्या अनेक वर्षापासून शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन यांच्या प्रचा प्रसाराची जबाबदारी असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुण्यातील कट्टर समर्थक राजाभाऊ भिलारे यांनी शिवसेना उपशहर प्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे पुण्यात शिंदेंना मोठा धक्का बसला आहे. शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनची जबाबदारी कोणाच्याही बंधनात काम करू शकत नाही. असे सांगत त्यांनी आपल्या पदाची राजीनामा दिला आहे.
हेही वाचा…फडणवीसांवर टिका, भाजप आक्रमक, शिंदे गटाच्या नेत्या म्हणाल्या “उद्धव ठाकरेंनीही तसं करावं”
दरम्यान, शिवसेना पक्ष फुटीनंतर शिवसेनेत दोन गट पडले. यानंतर उद्धव ठाकरे गटातील अनेक नेत्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. यातच आता राजाभाऊ भिलारे यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. राजाभाऊ भिलारे आता आपली पुढील कोणती भूमिका मांडणार त्याकडे सगळ्याचं लक्ष लागून राहिलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“ट्रीपल इंजिन सरकारला दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा डब्बा जड जातोय”, वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल
हेही वाचा…मनोज जरांग्यांचं उपोषण मागे, एकनाथ शिंदेंनी जरांग्यांना कोणतं आश्वासन दिलं ?
हेही वाचा…धाडसी निर्णय घेण्याची मुख्यमंत्र्यांमध्ये क्षमता, “मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय शांत बसणार नाही,” मनोज जरांगे पाटील
हेही वाचा…मनोज जरांगे पाटलाचं उपोषण सुटलं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जरांग्यांना ज्युस पाजलं
हेही वाचा…वाद आणखी चिघळला..! राणांच्या विरोधात यशोमती ठाकूर १०० कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार