मुंबई : केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्रालयाने एपीसी योजनेअंतर्गत कृषी प्रक्रिया क्लस्टर प्रकल्पांना मान्यता दिली आहे. या प्रकल्पाअंतर्गात अनेक लाभार्थ्यांना लाभ मिळाला आहे. परंतु यामध्ये चक्क राज्याचे आदिवासी विका मंत्री विजय कुमार गावित यांची कन्या सुप्रिया गावित यांची तापी औद्योगिक विकास कंपनीला देखील लाभ मिळाला आहे. यावरून काॅंग्रेसने भाजपवर जोरदार टिकास्त्र सोडलं आहे.
हेही वाचा…संसदेच्या विशेष अधिवेशात ‘या’ विधेयकावर होणार चर्चा, 17 सप्टेंबर बोलवली सर्वपक्षीय बैठक, हालचाली सुरू
किसान संपदा योजनेअंतर्गत केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्रालयाने कृषी प्रक्रिया क्लस्टर प्रकल्पांना सबसिडी दिली आहे. ह्यात मुख्य लाभार्थी आहे ते भाजप नेते आणि मंत्री विजय गावित यांची मुलगी. सुप्रिया गावित यांच्या “रेवा तापी औद्योगिक विकास” कंपनीला दहा कोटी ची सबसिडी मिळाली आहे. भाजप नेते आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा यांच्या पत्नीच्या कंपनीला देखील अशीच सबसिडी नुकतीच मिळाली आहे. किसान संपदा योजना शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी आहे. योजनेचा लाभ मात्र भाजप नेते घेत आहे. योजनेमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न तर वाढले नाही, भाजपात भरती झालेल्या नेत्यांचे उत्पन्न कोटींनी वाढले हे मात्र खरे आहे. असा घणाघात राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर लगावला आहे.
हेही वाचा…ठाकरे गटावर ‘शिंदे गट’ भारी पडणार, शिंदे गटाकडून ‘हा’ बडा वकिल युक्तिवाद करणार
दरम्यान, जेव्हा कुंपणच शेत खाते , केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्रालयाने APC योजनेअंतर्गत कृषी प्रक्रिया क्लस्टर प्रकल्पांना मान्यता दिली आणि लाभार्थी आहे- महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री विजय कुमार गावित यांची कन्या सुप्रिया गावित यांची “रेवा तापी औद्योगिक विकास” कंपनी. पंतप्रधान स्वतःला “प्रधान सेवक” म्हणवतात आणि त्यांच्या पक्षाचे लोक “शेख अपनी देख” तत्वज्ञानावर विश्वास ठेवत प्रथम स्वयंसेवेत रमतात. सरकारने जनतेसाठी काम करायचे असते, भाजपचे मंत्री आणि त्यांच्या मुलांसाठी नाही.. हा भाजपाचा ‘परिवारवाद’ नव्हे का? असा सवाल काॅंग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी भाजपला केला आहे.
योजना शेतकऱ्यांची
लाभार्थी यादी भाजप मंत्र्यांचीकिसान संपदा योजनेअंतर्गत केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्रालयाने कृषी प्रक्रिया क्लस्टर प्रकल्पांना सबसिडी दिली आहे. ह्यात मुख्य लाभार्थी आहे ते भाजप नेते आणि मंत्री विजय गावित यांची मुलगी.
सुप्रिया गावित यांच्या “रेवा तापी औद्योगिक… pic.twitter.com/L4my5srTeN— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) September 14, 2023
1/2 जेव्हा कुंपणच शेत खाते – केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्रालयाने APC योजनेअंतर्गत कृषी प्रक्रिया क्लस्टर प्रकल्पांना मान्यता दिली आणि लाभार्थी आहे- महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री विजय कुमार गावित यांची कन्या सुप्रिया गावित यांची “रेवा तापी औद्योगिक विकास” कंपनी pic.twitter.com/Au9GEu1a0r
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) September 14, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“सरसकट मराठ्यांना कुणबी दाखले देण्याचा नारायण राणेंचा विरोध, म्हणाले..,”
हेही वाचा…अजित पवारांचा फोटो पाहून सुप्रिया सुळे झाल्या भावूक, गुप्तेंच्या कार्यक्रमात सुळेंनी लावली हजेरी
हेही वाचा…“आरएसएसची पुण्यात बैठक, तीन शाळांना सुट्टी,” मुलांचे शैक्षणिक नुकसान कशासाठी? राष्ट्रवादीचा सवाल
हेही वाचा…“दिलेला शब्द खरा ठरावा, नाहीतर गाठ मराठ्यांशी”, राष्ट्रवादीने एकनाथ शिंदेंना दिला इशारा
हेही वाचा…“तब्बल १७ दिवसानंतर जरांगे पाटलांनी उपोषण मागे घेतले”, फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “यापुढे आम्ही..,”