पुणे : राष्ट्रीय स्वंयसेवक संघाची १४ सप्टेंबर ते १६ सप्टेंबर या दरम्यान राष्ट्रीय समन्वय बैठक पुण्यात होत आहे. या बैठकीसाठी सरसंघचालक मोहन भागवत, सहकार्यवाह दत्तात्रय होसबाळे, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा पुण्यात दाखल झाले आहेत. त्यामुळे पुण्यातील दोन शाळा आणि एका महाविद्यालयाला तीन दिवस सुट्टी देण्यात आली आहे. या प्रकाराबाबत विद्यार्थी संघटनांनी आक्षेप नोंदवला आहे. यावरून आता राष्ट्रवादीने भाजपवर जोरदार टिका केली आहे.
हेही वाचा…पुण्यात शिंदेंना मोठा धक्का, एकनाथ शिंदेंच्या ‘या’ कट्टर समर्थकाने दिला आपल्या पदाचा राजीनामा
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बैठक राजकीय हेतूसाठी; मग विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान कशासाठी? शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आजपासून तीन दिवसीय राष्ट्रीय समन्वय बैठक होणार आहे. या पारश्वभूमीवर येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या टिळक शिक्षणशास्त्र महाविद्यालय, एसपीएम इंग्रजी माध्यम शाळा व मूकबधीर शाळा यांना तिन दिवस सुट्टी देण्यात आली आहे. शहरातील अन्य ठिकाणी सोयीस्कर जागा उपलब्ध असताना शाळा आणि महाविद्यालयाच्या प्रांगणावर या बैठकीचे आयोजन केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीला जवाबदार कोण? असा प्रश्न राष्ट्रवादीने उपस्थित केला आहे.
हेही वाचा…“ट्रीपल इंजिन सरकारला दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा डब्बा जड जातोय”, वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल
दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रीय समन्वय बैठकीसाठी संघाचे देशभरातील स्वयंसेवक पुण्यात आले आहेत. ही बैठक स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर होणार आहे. या बैठकीसाठी मैदानावर मंडपाची उभारणी करण्यात आली आहे. या बैठकीमुळे शाळा व महाविद्यालयांना सुट्टी दिल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वेळापत्रकाचे नुकसान होणार आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बैठक राजकीय हेतूसाठी; मग विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान कशासाठी?
शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आजपासून तीन दिवसीय राष्ट्रीय समन्वय बैठक होणार आहे. या पारश्वभूमीवर येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या टिळक शिक्षणशास्त्र… pic.twitter.com/olDkpiM0KK
— NCP (@NCPspeaks) September 14, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“दिलेला शब्द खरा ठरावा, नाहीतर गाठ मराठ्यांशी”, राष्ट्रवादीने एकनाथ शिंदेंना दिला इशारा
हेही वाचा…“तब्बल १७ दिवसानंतर जरांगे पाटलांनी उपोषण मागे घेतले”, फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “यापुढे आम्ही..,”
हेही वाचा…संसदेच्या विशेष अधिवेशात ‘या’ विधेयकावर होणार चर्चा, 17 सप्टेंबर बोलवली सर्वपक्षीय बैठक, हालचाली सुरू
हेही वाचा…ठाकरे गटावर ‘शिंदे गट’ भारी पडणार, शिंदे गटाकडून ‘हा’ बडा वकिल युक्तिवाद करणार
हेही वाचा…शिवसेना अपात्र आमदारांच्या याचिकेवर सुनावणी सुरू, विधिमंडळाच्या सभागृहात शिंदे अन् ठाकरे गटात होणार वाकृयुद्ध ?