मुंबई : केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्रालयाने एपीसी योजनेअंतर्गत कृषी प्रक्रिया क्लस्टर प्रकल्पांना मान्यता दिली आहे. या प्रकल्पाअंतर्गात अनेक लाभार्थ्यांना लाभ मिळाला आहे. परंतु यामध्ये चक्क राज्याचे आदिवासी विका मंत्री विजय कुमार गावित यांची कन्या सुप्रिया गावित यांची तापी औद्योगिक विकास कंपनीला देखील लाभ मिळाला आहे. यावरून राष्ट्रवादी काॅंग्रेसने भाजपवर जोरदार टिकास्त्र सोडलं आहे.
हेही वाचा…“सरसकट मराठ्यांना कुणबी दाखले देण्याचा नारायण राणेंचा विरोध, म्हणाले..,”
आसाम भाजप सीएमनंतर आता प्रधानमंत्री किसान संपदा योजनेचा १० कोटींचा निधी मंत्री विजयकूमार गावितांची मुलगी डॉ.सुप्रिया गावित यांच्या फर्मच्या नावाने लुटला? घराणेशाहीतून भाजप झालीय भ्रष्टाचारी असा घणाघात राष्ट्रवादीने भाजपवर चढवला आहे. ‘किसान संपदा’ योजना पंतप्रधानांनी केवळ भाजप नेते आणि त्यांच्या परिवारासाठी सुरू केलेली आहे वाटतं. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यानंतर, भाजपचे आणखी एक नेते, महाराष्ट्र सरकारमधील मंत्री विजयकुमार गावित यांनी देखील आपल्या सत्तेचा वापर करून १० कोटींचा निधी स्वतःच्या कन्या, सुप्रिया गावित यांच्या फर्मकडे वळवला. पंतप्रधानांनी जरा डोळे उघडून पाहिलत तर बरं होईल, सर्वसामान्य जनतेने तुम्हाला, तुमच्या पक्षाला केंद्रात स्थान दिलेले आहे.
हेही वाचा…अजित पवारांचा फोटो पाहून सुप्रिया सुळे झाल्या भावूक, गुप्तेंच्या कार्यक्रमात सुळेंनी लावली हजेरी
किसान संपदा योजनेअंतर्गत केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्रालयाने कृषी प्रक्रिया क्लस्टर प्रकल्पांना सबसिडी दिली आहे. ह्यात मुख्य लाभार्थी आहे ते भाजप नेते आणि मंत्री विजय गावित यांची मुलगी. सुप्रिया गावित यांच्या “रेवा तापी औद्योगिक विकास” कंपनीला दहा कोटी ची सबसिडी मिळाली आहे. भाजप नेते आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा यांच्या पत्नीच्या कंपनीला देखील अशीच सबसिडी नुकतीच मिळाली आहे. किसान संपदा योजना शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी आहे. योजनेचा लाभ मात्र भाजप नेते घेत आहे. योजनेमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न तर वाढले नाही, भाजपात भरती झालेल्या नेत्यांचे उत्पन्न कोटींनी वाढले हे मात्र खरे आहे. असा घणाघात राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर लगावला आहे.
‘किसान संपदा’ योजना पंतप्रधानांनी केवळ भाजप नेते आणि त्यांच्या परिवारासाठी सुरू केलेली आहे वाटतं..!!!
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यानंतर, भाजपचे आणखी एक नेते, महाराष्ट्र सरकारमधील मंत्री विजयकुमार गावित यांनी देखील आपल्या सत्तेचा वापर करून १० कोटींचा निधी स्वतःच्या… pic.twitter.com/j7zk8yPt18
— NCP (@NCPspeaks) September 14, 2023
READ ALSO :
हेही वाचा…पिंपरी-चिंचवड न्यायालयाच्या इमारत उभारणीला ‘गती’, पहिल्या टप्प्यात ४ मजली इमारत उभारणार : आमदार लांडगे
हेही वाचा…“निवडणुका जवळ आल्या, राम मंदिराची सुरक्षा वाढवा,” प्रकाश आंबेडकरांची मागणी
हेही वाचा…शिवसेना प्रकरणात ४१ याचिका दाखल, पुढील सुनावणी कधी ? अध्यक्षांनी सांगितल्या तारखा
हेही वाचा…“सगळ्यातून सरकार बोध घेईल अन् चॅनल्सचे माईक..,” राज ठाकरेंचा सरकारला खोचक टोला
हेही वाचा…“शेतकऱ्यांची योजना अन् ‘या’ भाजप मंत्र्यांची मुलगी योजनांची लाभार्थी, काॅंग्रेसचा हल्लाबोल