मुंबई : मुंबई महानगरपालिकेतील कथित खिचडी घोटाळा प्रकरणात मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे. मुंबई महापालिकेच्या कथित डेड बॉडी प्रकरणानंतर आता खिचडी घोटाळ्यात आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे. आर्थिक गुन्हे शाखेने संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर, सुनिल बाळा कदम, महापालिकेचे तत्कालीन सहा. आयुक्त, नियोजन, बीएमसी, सह्याद्री रिफ्रेशमेंटचे राजीव, साळूखे, फोर्सवन मल्टी सर्विसेसचे भागीदार आणि कर्मचारी, स्नेहा कॅटरर्सटे भागीदार , इतर बीएमसी अधिकारी आणि इतरसंबंधित खासगी लोकांविरोधात हा गुन्हा दाखल केला आहे. यावरून आता शिंदे गटातील नेत्या शीतल म्हात्रे यांनी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
हेही वाचा…शिवसेना प्रकरणात ४१ याचिका दाखल, पुढील सुनावणी कधी ? अध्यक्षांनी सांगितल्या तारखा
सटरफटर कचोरी ताईंच्या खिचडी घोटाळ्यातले पैसे विश्वप्रवक्त्यांच्या मुलीच्या, भावाच्या आणि मित्राच्या खात्यात कसे काय गेले? म्हणजे या घोटाळ्यात थुकरट लोकं ही सहभागी आहेत की काय??? विश्वप्रवक्त्यांनी आता माध्यमांसमोर येऊन गरळ ओकण्यापेक्षा या प्रकरणावर ही खुलासा करावा… म्हणजे खिचडी नेमकी खाल्ली कुणी? हे जनतेला तरी समजेल. असं शीतल म्हात्रे यांनी म्हटलंय .
हेही वाचा…“सगळ्यातून सरकार बोध घेईल अन् चॅनल्सचे माईक..,” राज ठाकरेंचा सरकारला खोचक टोला
दरम्यान, शिवसेना पक्ष फुट प्रकरणानंतर अनेक नेत्यांनी शिंदेंच्या शिवसेनेच प्रवेश केला. यामध्ये शीतल म्हात्रेंनी देखील शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. तर किशोरी पेडणेकर अद्यापही ठाकरेंच्या शिवसेनेत आहेत. यातच आता ठाकरे गटातील नेत्यांवर शिंदे गटातील नेते विविध प्रकरणांच्या माध्यमातून लक्ष्य करीत आहेत.
सटरफटर कचोरी ताईंच्या खिचडी घोटाळ्यातले पैसे विश्वप्रवक्त्यांच्या मुलीच्या, भावाच्या आणि मित्राच्या खात्यात कसे काय गेले? म्हणजे या घोटाळ्यात थुकरट लोकं ही सहभागी आहेत की काय??? विश्वप्रवक्त्यांनी आता माध्यमांसमोर येऊन गरळ ओकण्यापेक्षा या प्रकरणावर ही खुलासा करावा… म्हणजे खिचडी… pic.twitter.com/D2lZtfB1Kx
— sheetal mhatre (@sheetalmhatre1) September 14, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“कारण नसतांना मला ट्रोल केलं जातंय,” अजित पवारांनी व्यक्त केली नाराजी
हेही वाचा…विलासराव देशमुख, चव्हाण, फडणवीस या मुख्यमंत्र्यांची परंपरा शिंदे मोडीत काढणार, तब्बल ३२ हजार रूपये…,
हेही वाचा…“घराणेशाहीतून भाजप झालीय भ्रष्टाचारी” भाजप मंत्र्यांच्या मुलीने लुटला १० कोटींचा निधी, राष्ट्रवादीची जोरदार टिका
हेही वाचा…पिंपरी-चिंचवड न्यायालयाच्या इमारत उभारणीला ‘गती’, पहिल्या टप्प्यात ४ मजली इमारत उभारणार : आमदार लांडगे
हेही वाचा…“निवडणुका जवळ आल्या, राम मंदिराची सुरक्षा वाढवा,” प्रकाश आंबेडकरांची मागणी