छत्रपती संभाजीनगर : राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक येत्या १६ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे होत आहे. या मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री यांच्यासह २९ मंत्री, सुमारे २५० सचिव, उपसचिव आणि वरिष्ठ दर्जाचे अधिकारी येत आहेत. या सर्वांसाठी छत्रपती संभाजीनगर येथील हॉटले, विश्रामगृहात खोल्यांचे बुकींग करण्यात आले आहे. यावरून आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर जोरदार टिका केली आहे.
हेही वाचा…“घराणेशाहीतून भाजप झालीय भ्रष्टाचारी” भाजप मंत्र्यांच्या मुलीने लुटला १० कोटींचा निधी, राष्ट्रवादीची जोरदार टिका
जयंत पाटील म्हणाले की, एकीकडे मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी फाईव्ह स्टार हॉटेल्स, ३०० गाड्यांचा ताफा, दीड हजार रुपयांची जेवणाची एक थाळी असा शाही थाट… दुसरीकडे मात्र कांद्याला प्रति क्विंटल ३५० रुपये अनुदान देण्याचे सरकारने जाहीर केलेले असताना, मालेगावच्या शेतकऱ्याच्या खात्यावर ११२ क्विंटल कांद्याचे अवघे २५२ रुपये अनुदान जमा करत क्रूर थट्टा केली आहे. लोकांच्या पैशांवर मजा करणाऱ्यांनाही जागतिक लोकशाही दिनाच्या शुभेच्छा! असा खोचक टोलाही जयंत पाटलांनी लगावला.
हेही वाचा…पिंपरी-चिंचवड न्यायालयाच्या इमारत उभारणीला ‘गती’, पहिल्या टप्प्यात ४ मजली इमारत उभारणार : आमदार लांडगे
मंत्रिमंडळाची बैठक असेल तर मुख्यमंत्र्यांचा मुक्काम सुभेदारी या सरकारी विश्रामगृहातच असतो. मनोहर जोशी, विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, देवेंद्र फडणवीस यांनी ती पंरपरा निर्माण केली होती. मात्र एकनाथ शिंदे यांनी ती पंरपरा मोडीत काढणार आहेत. ते १६ सप्टेंबरला फोर स्टार हॉटेलात ३२ हजार रूपये किराया असलेल्या आलिशान सूटमध्ये राहतील अशी माहिती मिळत आहे.
हेही वाचा…“निवडणुका जवळ आल्या, राम मंदिराची सुरक्षा वाढवा,” प्रकाश आंबेडकरांची मागणी
दरम्यान, सुभेदारी विश्रामगृह अपूरे पडेल. तसेच मंत्रिमंडळ बैठक विभागीय आयुक्तालयाऐवजी स्मार्ट सिटी कार्यालयात होणार आहे. शिवाय सुरक्षा व्यवस्थेमुळेही मुक्काम स्थळात बदल केल्याची माहिती पालकमंत्री संदीपान भूमरे यांनी दिव्य मराठीशी बोलतांना दिली आहे. यामुले सुभेदारीवर यंदा मंत्रिमंडळ बैठकीच्या वेळी नेमही दिसणारे राजकीय कार्यकर्ते, अधिकाऱ्यांच्या धावपळीचे चित्र पाहण्यास मिळणार नाही.
एकीकडे मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी फाईव्ह स्टार हॉटेल्स, ३०० गाड्यांचा ताफा, दीड हजार रुपयांची जेवणाची एक थाळी असा शाही थाट…
दुसरीकडे मात्र कांद्याला प्रति क्विंटल ३५० रुपये अनुदान देण्याचे सरकारने जाहीर केलेले असताना, मालेगावच्या शेतकऱ्याच्या खात्यावर ११२ क्विंटल कांद्याचे… pic.twitter.com/Gqdq0Wr47R
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) September 15, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“अन्यथा दलालांचे खिसे भरणाऱ्या सरकारला धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाही”
हेही वाचा…धक्कादायक….! ठाकरे गटाच्या युवती सेनेच्या महिलेची मुलांसमोरच चाकूने भोसकून हत्या, एकच खळबळ
हेही वाचा…शीतल म्हात्रेंची किशोरी पेडणेकरांवर जोरदार टिका, म्हणाल्या की, “सटरफटर कचोरी ताईंच्या..,”
हेही वाचा…“कारण नसतांना मला ट्रोल केलं जातंय,” अजित पवारांनी व्यक्त केली नाराजी
हेही वाचा…विलासराव देशमुख, चव्हाण, फडणवीस या मुख्यमंत्र्यांची परंपरा शिंदे मोडीत काढणार, तब्बल ३२ हजार रूपये…,