मुंबई : आगामी काही महिन्यात राजस्थानमध्ये विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकांच्या प्रचारासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या राजस्थानमध्ये प्रचार करण्यासाठी गेले आहेत. यावरून राजस्थानमध्ये गेलेच आहात तर थोडं कामात काम म्हणून आपल्या राज्यासाठी आवश्यक असणाऱ्या राजस्थान सरकारच्या योजनांची माहिती घेऊन या, असा शाब्दिक टोला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी फडणवीसांना लगावला आहे.
हेही वाचा…शीतल म्हात्रेंची किशोरी पेडणेकरांवर जोरदार टिका, म्हणाल्या की, “सटरफटर कचोरी ताईंच्या..,”
रोहित पवार म्हणाले की, दुष्काळाचं संकट, पेपरफुटी, कंत्राट भरती, परिक्षा फीच्या माध्यमातून होणारी लूट आरक्षण यामुळं आज संपूर्ण राज्य असंतोषात धगधगत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री राजस्थानमध्ये पक्षाच्या प्रचारासाठी गेले असल्याची बातमी बघून नक्कीच आश्चर्य वाटलं असं रोहित पवारांनी म्हटलं. त्यावर राजस्थान सरकारने परीक्षा फी संदर्भात आणलेल्या One Time Registration योजनेत एकदा ६०० रू. भरून नोंदणी केली की विद्यार्थ्यांना परिक्षा शुल्क भरण्याची गरज नसते. आज महाराष्ट्राच्या युवकांचीही हीच मागणी आहे. पेपरफुटी रोखण्यासाठी राजस्थान सरकारने आणलेला कायदा अत्यंद प्रभावी आहे आणि राजस्थान सरकारच्या याच कायद्याच्या धर्तीवर उत्तराखंड सरकारनेही पेपरफुटी कायदा केला आहे.
हेही वाचा…“कारण नसतांना मला ट्रोल केलं जातंय,” अजित पवारांनी व्यक्त केली नाराजी
आज राज्यात सरळसेवा भरती परीक्षेत रोज दोन चार ठिकाणी पेपर फुटीच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे आपल्या राज्यातही अशा प्रकारचा कायदा व्हावा, ही राज्यभरातील तरुणाईची मागणी आहे. महागाई आणि बेरोजगारीने बेजार झालेल्या, पिढीजात गरिबीच्या चक्रव्युहात अडकलेल्या शहरी भागातील गरिबांसाठी राजस्थान सरकारने आणलेली शहरी रोजगार हमी योजना, पाचशे रुपयात सिलिंडर या योजना अभ्यासण्याची गरज आहे. फडणवीस साहेब आपण पक्षाच्या कामासाठी राजस्थान मध्ये गेलेच आहात तर थोडं कामात काम म्हणून आपल्या राज्यासाठी आवश्यक असणाऱ्या राजस्थान सरकारच्या या योजनांची माहिती घेतली आणि अभ्यास करून या योजना आपल्या राज्यात राबवण्यासाठी प्रयत्न केले, तर आपल्या राज्याला नक्कीच फायदा होईल. असा टोला रोहित पवारांनी लगावला आहे.
#दुष्काळाचं_संकट, #पेपरफुटी, #कंत्राटी_भरती , #परीक्षा_फी च्या माध्यमातून होणारी लूट, #आरक्षण यामुळं आज संपूर्ण राज्य असंतोषात धगधगत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री (गृहमंत्री) राजस्थानमध्ये पक्षाच्या प्रचारासाठी गेले असल्याची बातमी बघून नक्कीच आश्चर्य वाटलं.@Dev_Fadnavis… pic.twitter.com/ghbnNl1FuX
— Rohit Pawar (@RRPSpeaks) September 15, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“..तर राजीनामा देईन,” अजित पवारांच्या दोन्ही कट्टर समर्थक नेत्यांमध्ये ताळमेळचा अभाव ?
हेही वाचा…गोकूळच्या सभेत मोठा राडा, महाडिक समर्थक आक्रमक, बॅरिकेट्स तोडून आत घुसण्याचा प्रयत्न
हेही वाचा…प्रचंड खर्च..! “मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी फाईव्ह स्टार हॉटेल्स, ३०० गाड्यांचा ताफा, 1500 रु. जेवणाची एक थाळी”
हेही वाचा…“अन्यथा दलालांचे खिसे भरणाऱ्या सरकारला धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाही”
हेही वाचा…धक्कादायक….! ठाकरे गटाच्या युवती सेनेच्या महिलेची मुलांसमोरच चाकूने भोसकून हत्या, एकच खळबळ