मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेतेमंडळीं विरोधातील चौकशा आणि गुन्हे दाखल होण्याचे शुल्ककाष्ठ काही संपताना दिसत नाही. माजी महापौर किशोरी पेडणेकर, सुरज चव्हाण यांच्या पाठोपाठ आता ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्यासह त्यांच्या पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे ठाकरे गटाची डोकेदुखी वाढलेली आहे.
हेही वाचा…“जम्मू काश्मिरमध्ये तीन जवान शहीद झाले, तेव्हा भाजपच्या कार्यालयात कशाचा आनंद साजरा केला ?”
जोगेश्वरी येथील भूखंड आणि हॉटलेच्य बांधकामप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार तथा माजी मंत्री रवींद्र वायकर, त्यांची पत्नी तसेच इतरांविरोधात आर्थिक गुन्हे शाखेकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने आझाद मैदान पोलिस ठाण्यात हे गुन्हे दाखल केले आहेत.
हेही वाचा…“राज्य असंतोषात धगधगत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री राजस्थानमध्ये पक्षाच्या प्रचारासाठी”
दरम्यान, मागील काही दिवसापासून ठाकरे गटातील अनेक नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या सातत्याने ठाकरे गटातील नेत्यांवर भ्रष्टचाराचे आरोप करीत आहेत. त्यामुळे ठाकरे गटातील अनेक नेत्यांवर अटकेची टांगती तलवार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…गोकूळ संघाच्या सभेवरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्या, महाडिक गटांचा सतेज पाटलांवर गंभीर आरोप
हेही वाचा…मराठवाड्यात राज्यमंत्री मंडळाची अलिशान बैठक; शेतकरी मात्र हैराण!
हेही वाचा…“शरद पवार अन् उद्धव ठाकरेंसाठी ‘तो’ निर्णय गेमचेंजर ठरणार” , महत्वाच्या तारखा जाहीर
हेही वाचा…“राणा-यशोमती ठाकूर वादात बच्चू कडूंची उडी,” फडणवीसांचा उल्लेख करत तक्रार दाखल करणार
हेही वाचा…पैशाचा वारेमाफ खर्च..! “कॅबिनेट बैठक आहे की महायुतीच्या मंत्र्यांचे पर्यटन ?” वडेट्टीवारांचा सवाल