मुंबई : शिवसेना अपात्र आमदारांच्या याचिकेवर येत्या सोमवारी पुढील सुनावणी पार पडणार आहे. दोन्ही गटाने कागदपत्रांची अदलाबदल न केल्याने विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी यासाठी वेळ वाढवून दिला होता. त्यावर आता ठाकरे गटातील आमदार सुनील प्रभू यांनी १६ आमदारांना अपात्र करावे यासाठी दाखल याचिकेवर सुद्धा सुनावणी होणार आहे.
हेही वाचा…गोकूळच्या सभेत मोठा राडा, महाडिक समर्थक आक्रमक, बॅरिकेट्स तोडून आत घुसण्याचा प्रयत्न
शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्र याचिकेसंदर्भात सुप्रिम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांकडे निर्णय सोपवला होता. त्यावर आता ठाकरे गट आणि शिंदे गटातील प्रत्येक आमदारांची विधिमंडळाच्या सभागृहात सुनावणी होत आहे. ठाकरे गटाकडून वकील असीम सरोदे आणि देवदत्त कामत तर शिंदे गटाकडून अनिल सिंग आपली बाजू मांडणार आहेत. याची आता पुढील सुनावणी सोमवारी सकाळी अकरा वाजता विधिमंडळाच्या सभागृहात होणार आहे. त्याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.
हेही वाचा…प्रचंड खर्च..! “मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी फाईव्ह स्टार हॉटेल्स, ३०० गाड्यांचा ताफा, 1500 रु. जेवणाची एक थाळी”
दरम्यान, शिवसेना पक्ष फुट प्रकरणानंतर आता राष्ट्रवादीचे पक्ष फुट प्रकरण देखील निवडणुक आयोगात गेलं आहे. राष्ट्रवादीच्या अजित पवार आणि शरद पवार गटाने यासंदर्भात याचिका दाखल केल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष नाव आणि चिन्हाबाबत ६ ऑक्टोंबर रोजी निवडणुक आयोगात सुनावणी होणार आहे. यावेळी दोन्ही गटाकडून आपली बाजू मांडण्यात येणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“राणा-यशोमती ठाकूर वादात बच्चू कडूंची उडी,” फडणवीसांचा उल्लेख करत तक्रार दाखल करणार
हेही वाचा…पैशाचा वारेमाफ खर्च..! “कॅबिनेट बैठक आहे की महायुतीच्या मंत्र्यांचे पर्यटन ?” वडेट्टीवारांचा सवाल
हेही वाचा…“जम्मू काश्मिरमध्ये तीन जवान शहीद झाले, तेव्हा भाजपच्या कार्यालयात कशाचा आनंद साजरा केला ?”
हेही वाचा…“राज्य असंतोषात धगधगत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री राजस्थानमध्ये पक्षाच्या प्रचारासाठी”
हेही वाचा…“..तर राजीनामा देईन,” अजित पवारांच्या दोन्ही कट्टर समर्थक नेत्यांमध्ये ताळमेळचा अभाव ?