पुणे : बारामती दौंड व इंदापूर तालुक्यातील मेंढपाळ समाज अनेक वर्षांपासून भटकंती करत आहे. स्वतःची शेती नसल्यामुळे पुरेशा चाऱ्या अभावी आपले गाव सोडून गावोगावी भटकंती करून मेंढपाळी करणाऱ्या मेंढपाळ बांधवांवरती गेल्या अनेक दिवसांपासून बारामती तालुक्यातील स्थानिक शेतकरी व टवाळखोर व वनकर्मचारी यांचेकडून होणारे हल्ल्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे, मागील काही दिवसांत पारवडी येथे लहान मुलीच्या डोक्यात दगड घालण्यात आला होता. म्हणजे विकृतीचा झालेला आहे, जणू काही माणुसकीचं संपली का काय असा प्रश्न पडतो.
“मंत्रिमंडळ विस्तार प्रश्न गरजेचा नाही, पण शिवसेना प्रहारमध्ये विलीन करू नका”
बारामती तालुक्यातील सुपा अभय अरण्य, व बारामती वनपरिक्षेत्रातील मेंढपाळ यांच्यावर वनकर्मचारी अन्याय करीत आहेत, मेंढपाळ, महिला, लहान मुले टार्गेट होत आहेत. तसेच बारामतीसूपा वनपरिक्षेत्रातील कर्मचारी मेंढपाळांची बकरी उचलून घेऊन जातात व पैशाची मागणी केली जाते, अशी मेंढपाळाची तक्रार आहे, महिलांना धमकावणे, अरेरावी शिवीगाळ करणे असे अनेक प्रकार सुरू आहेत. बारामती तालुक्यातील सुपा, उंडवडी, शिर्सुफळ, येथे इंग्रजांच्या काळापासून चरावू कुरणे राखीव होती. ती शोधून तेथे मेंढ्या चारण्यास परवानगी द्यावी. यापुढे मेंढपळांवरती खोटे गुन्हे दाखल केले केले.
“मविआ सरकारचे निर्णय का बदलले? कोर्टात तरी खरं सांगा”; राष्ट्रवादीचा शिंदेंना सवाल
या अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी वनपरिक्षेत्र पुणे बारामती विभाग, एमआयडीसी येथील कार्यालयावर यशवंत ब्रिगेड व मेंढपाळ यांचा मेंढ्या सहित मोर्चा काढण्यात आला. यावेळी यशवंत ब्रिगेड चे प्रदेशाध्यक्ष बापुराव सोनवलकर अहील्या सावित्री सामाजिक संघटनेच्या अध्यक्षा डॉ अर्चना पाटील, संपतराव टकले, किशोर मासाळ, रवींद्र टकले, वसंतराव घुले, माणिकराव काळे, पाटस गावचे, पुरुषोत्तम ढोणे, यशवंत सेना अध्यक्ष तानाजी कारंडे, सागर देवकाते संभाजी शिंदे राज पाटील, व मेंढपाळ बांधव उपस्थित होते. तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी यांना यशवंत ब्रिगेडच्या वतीने निवेदन दिले.
Read also
- निष्ठा असावी तर अशी..! शिवसैनिकांनी स्वत:च्या रक्ताने पत्र लिहून ठाकरेंना दिला पाठिंबा
- “आमचे शिवसैनिक पळून जाणारे नाहीत, त्यांनी थांबून तुम्हाला ठोकलं असतं”
- फडणवीसांचा दिल्ली दौरा, मुख्यमंत्र्यांची प्रकृती बरी नाही, अंतर्गत कलह अटळ
- संजय राऊतांसोबत त्यांच्या पत्नीची देखील चौकशी होणार; इडीकडून समन्स, तर राऊतांची कोठडी वाढविली
- संजय राऊतांसोबत त्यांच्या पत्नीची देखील चौकशी होणार; इडीकडून समन्स, तर राऊतांची कोठडी वाढविली