गेल्या काही दिवसात लसीकरणाचा वेग मंदावल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. राज्यात लसींअभावी अनेक ठिकाणी लसीकरण केंद्र बंद ठेवावी लागत आहेत. लसीच्या पुरवठ्यावरून केंद्र आणि राज्य सरकारमध्ये जुंपल्याचे देखील पाहायला मिळाले होते. आता पुन्हा एकदा काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर लसीच्या पुरवठ्यावरून निशाणा साधला आहे.
गुजरातची लोकसंख्या महाराष्ट्रापेक्षा निम्मी आहे. तसेच, अॅक्टिव व एकूण रुग्ण संख्या देखील गुजरातमध्ये कमी आहे. मात्र, असे असताना देखील महाराष्ट्राच्या तुलनेत गुजराताला अधिक लस कशा ? असा सवाल सचिन सावंत यांनी लसीच्या पुरवठ्यावरून फडणवीसांना केला आहे.
१. @BJP4Maharashtra & @Dev_Fadnavis जीं साठी दोन साधेसोपे प्रश्न
जर महाराष्ट्राच्या 1३ कोटी लोकसंख्येला २ कोटी लसी तर
गुजरात च्या ६.५० कोटी लोकसंख्येला १.६२ कोटी लसी का?
तरी आपण म्हणता महाराष्ट्राला जास्त लसी मिळाल्या? https://t.co/3nIpay0Hdh— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) May 21, 2021
जर महाराष्ट्राच्या 13 कोटी लोकसंख्येला 2 कोटी लसी तर गुजरात च्या 6.50 कोटी लोकसंख्येला 1.62 कोटी लसी का? तरी आपण म्हणता महाराष्ट्राला जास्त लसी मिळाल्या?, असा सवाल त्यांनी फडणवीसांना विचारला आहे.
सचिन सावंत यांनी गुजरात आणि महाराष्ट्रातील अॅक्टिव, एकूण रुग्ण, मृत्यूची आकडेवारी देखील मांडली. सोबतच, महाराष्ट्राला 2 कोटी लसी व गुजरातला 1.62 कोटी लसी का?, याचे उत्तर फडणवीसांनी द्यावे, असे त्यांनी म्हटले आहे.
Read Also :
- हवाईदलाचे ‘मिग 21’ विमान कोसळले, पायलटचा मृत्यू
- ‘परीक्षा रद्द करून शिक्षणाची थट्टा चालवली आहे’, न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
- ‘झोला उठाके चल दूँगा टाइप नेत्यांनी राजीवजींच्या जीवनचरित्रातून बोध घ्यावा’
- ‘गुजरातला हजार कोटी व महाराष्ट्राला काहीच नाही, हा सापत्नभाव फडणवीसांना तरी पटेल काय?’
- ‘…म्हणून पंतप्रधान मोदींनी गुजरातला तात्काळ मदत जाहीर केली’