मुंबई – शिवसेनेने विधान परिषदेच्या दोन जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. शिवसेना नेते रामदास कदम यांच्या विधान परिषद सदस्यत्वाची मुदत संपत आल्याने आता या जागेवर उमेदवारी कोणाला देणार, याविषयी शिवसेनेच्या गोटात चर्चा सुरु होती. अखेर पक्षाने उमदेवारांची नावे जाहीर केली आहे.
शिवसेनेने मुंबई महानगर पालिका स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून माजी आमदार सुनील शिंदे तर अकोला-बुलढाणा-वाशीम मतदारसंघातून आमदार गोपिकिशन बाजोरीया यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ऑडिओ क्लिप प्रकरणामुळे वादात सापडलेले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांची अखेर विकेट पडली आहे.
‘अधिकाऱ्यांना मॅनेज करून दाऊदचे झाले ज्ञानदेव’; मंत्री मलिकांचा पुन्हा गौप्यस्फोट
विधानसभा निवडणुकीदरम्यान शिवसेनेचे माजी आमदार सुनील शिंदे यांनी वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरे यांच्यासाठी जागा सोडली होती. शिवसेनेने याची परतफेड म्हणून शिंदे यांना विधान परिषदेसाठी उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले. सुनील शिंदे हे 2007 मध्ये ते मुंबई महापालिकेत निवडून आले होते. बेस्ट समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी कार्यभार सांभाळला होता. 2014 मध्ये सचिन अहिर यांचा पराभव करुन विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आले होते.
असं काय झालं की तीन कृषी कायदे मागे घेऊन पंतप्रधान मोदींना माफी मागावी लागली?
तर दुसरीकडे अकोला-बुलढाणा-वाशिम मतदारसंघातून शिवसेनेने गोपीकिशन बाजोरीया यांना उमेदवारी दिली आहे. या ठिकाणी त्यांच्या विरोधात भाजपच्या वसंत खंडेलवाल उभे आहेत. त्यामुळे भाजप आणि शिवसेना अशी चुरशीची लढत पाहायला मिळत आहे.
Read Also :
- फडणवीसांचा ‘तो’ गुण चांगला; नवाब मलिक यांनी कौतुक करत मारला टोला
- ‘पक्षाने विश्वास टाकला, सर्वांचे आभार, विधिमंडळात पुन्हा जोमाने काम करणार’
- “आजची सकाळ मला अखंड हिंदुस्तानातील शेतकऱ्यांसाठी स्वातंत्र्याची पहाट वाटते”; संजय राऊत यांचे प्रतिपादन
- सोमय्यांचा अर्जुन खोतकरांवर 100 कोटी घोटाळ्याचा आरोप, खोतकर म्हणाले…
- रत्नागिरीतील तब्बल ८६ एसटी कर्मचारी निलंबित; संपकरी कर्मचारी मात्र आंदोलनावर ठाम