मुंबई : देशात कोरोना व्हायरस महामारीमुळे मोठे संकट निर्माण झाले आहे. या व्हायरसच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत आहे. राज्यांकडून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यातच आता भाजप नेते आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत हे कोरोना व्हायरसबाबत केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत.
कोरोना व्हायरस हा सुद्धा एक जीव आहे. त्यालाही जगण्याचा अधिकार आहे, असे विचित्र वक्तव्य त्रिवेंद्र सिंह रावत यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून आता टीका केली जात आहे.
हे उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र रावत. काय तारे तोडतायत ऐका. कुठून हे नग मिळतात? pic.twitter.com/cgjakNRkfS
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) May 14, 2021
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील यावरून भाजपला टोला हाणला आहे. त्यांनी त्रिवेंद्र सिंह रावत यांचा व्हिडीओ शेअर केला असून, ‘हे उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र रावत. काय तारे तोडतायत ऐका. कुठून हे नग मिळतात?’, असा टोला लगावला.
दरम्यान, कोरोना व्हायरस सुद्धा जिवंत जीव आहे. इतर लोकांप्रमाणेच त्यालाही जगण्याचा अधिकार आहे. परंतु, आपण मानव त्याच्यापेक्षा स्वत:ला बुद्धिमान समजतोय आणि त्याला नष्ट करायला निघालो आहोत. त्यामुळेच कोरोना व्हायरस वारंवार स्वत:ला बदलत आहे. मानवाला जर सुरक्षित राहायचे असेल तर त्याने व्हायरसच्या पुढे निघून गेलं पाहिजे, असे वक्तव्य रावत यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून त्यांना ट्रोल केले जात आहे.
Read Also :
- ‘गुणरत्न सदावर्ते नीट बोल, आमच्यात माज काढण्याची ताकद आहे’
- ‘जयंत पाटील-सीताराम कुंटे वादात कोणतेही तथ्य नाही’
- केंद्र सरकारने ऑक्सिजनच्या पुरवठ्याचा लेखाजोखा मांडावा, अजित पवारांची मागणी
- मुख्यमंत्र्यांच्या अनियोजित भेटीवरून अखेर पडदा उठला, यासाठी गेले होते न्यायालयात…
- …तरीही ५ जूनला निघणार मोर्चा; शिवसंग्रामचे मेटे यांनी पुकारला एल्गार