मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर आता राज्यातील राजकारण तापले आहे. आरक्षणासाठी अडथळा ठरत असलेल्या 102 व्या घटना दुरुस्तीसंदर्भात आता केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याच पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाविरोधात न्यायालयात याचिका करणारे गुणरत्न सदावर्ते आणि मराठा आरक्षणासाठी लढणारे विनोद पाटील यांच्यात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा झाली. चर्चेदरम्यान दोघांमध्ये बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले.
दोघांमधील चर्चेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विनोद पाटील यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करत असून, यात ते सदावर्ते यांच्यावर चांगलेच भडकलेले पाहायला मिळत आहेत.
मराठा आरक्षणासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणार
संविधानिक भाषेमध्ये चर्चा असेल तर जरूर करू, चुकीचे भाषा सहन करणार नाही pic.twitter.com/fGhCWOgFoP— Vinod Patil (@vnpatilofficial) May 14, 2021
मराठा आरक्षणासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणार आहे. संविधानिक भाषेमध्ये चर्चा असेल तर जरूर करू, चुकीचे भाषा सहन करणार नाही, अशा शब्दात विनोद पाटील यांनी सदावर्ते यांना सुनावले.
आम्हाला माजुर्डे म्हणायचे आणि आम्ही विरोध करायचा नाही हे योग्य आहे काय?, याच्यासाठी हा प्लॅटफॉर्म आहे का, हे ऐकणारी मराठ्याची औलाद नाही. गुणरत्न सदावर्ते नीट बोल, संविधानिक भाषेत बोल. माजुर्डेपणाची ही भाषा मी तोंडावर ऐकून घेणार नाही, असे त्यांनी सुनावले.
कोणता अधिकार आहे, चार जणांकडून पैसे घेऊन मराठा आरक्षणाला विरोध करायचा. या माणसाचं आयुष्य ब्लॅकमेलिंगमध्ये गेलं. हे आम्हाला काय ज्ञान शिकवणार, आमच्यात माज काढण्याची ताकद आहे, असा इशाराच विनोद पाटील यांनी सदावर्तेंना दिला.
Read Also :
- ‘जयंत पाटील-सीताराम कुंटे वादात कोणतेही तथ्य नाही’
- केंद्र सरकारने ऑक्सिजनच्या पुरवठ्याचा लेखाजोखा मांडावा, अजित पवारांची मागणी
- मुख्यमंत्र्यांच्या अनियोजित भेटीवरून अखेर पडदा उठला, यासाठी गेले होते न्यायालयात…
- …तरीही ५ जूनला निघणार मोर्चा; शिवसंग्रामचे मेटे यांनी पुकारला एल्गार
- “अशोक चव्हाणांनी औकातीत राहावे”