मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज सकाळी अचानक साडे अकराच्या सुमारास महाधिवक्ते अभिषेक कुंभकोणी तसेच, महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांच्यासमवेत मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. ही भेट सदिच्छा असल्याचं कुणाचा तर्क होता, तर राज्यातल्या लसीकरण प्रश्नावरून आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून ही भेटअसल्याच्या चर्चा देखील काही कालावधीसाठी सुरु होत्या. मात्र, हातात यावर पडदा पडला असून, भेटीमागचे कारण समोर आले आहे.
उच्च न्यायालयात आयोजित केलेल्या लसीकरण कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आले होते. यावेळी त्यांनी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांची देखील भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये सहज काही विषयांवर गप्पा झाल्या. त्यामुळे अखेर मुख्यमंत्र्यांची ही भेट सदिच्छा भेट असल्याचे समोर येत आहे.
मुख्यमंत्र्यांची ही भेट ठरलेली नव्हती. तसेच भेटीचे कारणही अद्याप गुलदस्त्यात असून, मुख्यमंत्र्यांनी थेट मुख्य न्यायाधीशांची भेट घेतल्याचे वृत्त आहे. शिष्टाचार असा आहे की मुख्य न्यायाधीश मुख्यमंत्र्यांची किंवा इतर कोणत्याही मंत्र्यांची भेट घेऊ शकत नाहीत. मात्र, मुख्यमंत्री हे न्यायाधीशांची भेट घेऊ शकतात. त्यानुसार आज ही भेट मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे.
Read Also :
- “अशोक चव्हाणांनी औकातीत राहावे”
- कास धरणाची उंची वाढवण्याच्या, शिवेंद्रराजे भोसले यांच्या अधिकाऱ्यांना सूचना
- मी भाजप खासदार असताना माझा देखील फोन टॅप झाला, सरकारने कारवाई करावी
- राज्यातील आगामी महापालिका निवडणुका कोरोनामुळे लांबणीवर?
- “कॅबिनेटमध्ये भांड्याला भांडे लागले असेल, पण आमची भांडी काचेची नाहीत” संजय राऊत