नवी दिल्ली : 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर अद्याप काँग्रेसला पूर्ववेळ अध्यक्ष मिळालेला नाही. लवकरच अध्यक्षपदासाठी पक्षात निवडणुका देखील पार पडणार आहे. मात्र त्याआधीच अध्यक्षपदावरून पक्षातील अंतर्गत वाद समोर येत आहे.
राहुल गांधींना पुन्हा एकदा त्वरित काँग्रेसचे अध्यक्ष करावे, अशी मागणी करणारा प्रस्ताव आता दिल्ली काँग्रेसने मंजूर केला आहे.
Rahul ji is only one who can inspire Congress workers. All his predictions are coming true from farmers issue to ills of GST. He's shown his leadership ability. So we passed resolution to make him Congress president again: Delhi Pradesh Congress Committee President Anil Chaudhary https://t.co/FjfBOEUMJn pic.twitter.com/c3tlSTee2B
— ANI (@ANI) January 31, 2021
या प्रस्तावाबाबत माहिती देताना दिल्ली प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष अनिल चौधरी म्हणाले की, फक्त राहुल गांधीच कॉंग्रेस कार्यकर्त्यांना प्रेरणा देऊ शकतात. शेतकऱ्यांपासून ते जीएसटीपर्यंतचे त्यांचे अंदाज खरे ठरत आहेत. राहुल गांधी यांनी आपली नेतृत्व क्षमता दाखवली आहे. त्यामुळे आम्ही त्यांना पुन्हा कॉंग्रेस अध्यक्ष बनवण्याचा ठराव मंजूर केला.
दरम्यान, या प्रस्तावासोबतच दिल्ली काँग्रेसने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्याच्या मागणीचाही प्रस्ताव मंजूर केला आहे.
Read Also :
- ‘शरद पवार हे वरिष्ठ नेते आहेत, पण…’, केंद्रीय कृषीमंत्र्यांचे प्रत्युत्तर
- छत्रपती शिवाजी महाराज कन्नड भूमीतले, कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचा विचित्र दावा
- संजय राऊतांच्या लेकीचा साखरपुडा संपन्न, जावई आहेत तरी कोण ?
- आज अर्थसंकल्प! अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी सरकार कोणत्या घोषणा करणार ?
- विधान परिषदेत पॉर्न पाहताना आढळला काँग्रेस आमदार ? स्पष्टीकरण देताना म्हणाला…