बंगळुरू : कर्नाटकच्या राजकारणातील सभागृहात पॉर्न व्हिडीओ पाहण्याची परंपरा सुरूच असल्याचे दिसून येत आहे. कर्नाटक विधान परिषदेच्या सभागृहात काँग्रेस आमदार पॉर्न व्हिडीओ पाहत असल्याचे आढळल्याचा दावा केला जात आहे.
काँग्रेसचे आमदार प्रकाश राठोड यांच्यावर विधान परिषदेच्या सभागृहामध्ये पॉर्न व्हिडीओ पाहत असल्याचा आरोप होत आहे. राठोड हे आपल्या मोबाईलवर स्क्रोल करत असताना त्यांच्या फोनमध्ये अश्लिल व्हिडीओ असल्याचे दृष्य कॅमेरात कैद झाली आहे.
प्रकाश राठोड यांच्यावरील आरोपानंतर भाजपने आक्रमक भूमिका घेतली असून, त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. याआधी देखील 2012 मध्ये लक्ष्मण सावदी आणि इतर दोन आमदार सभागृहाच्या आतमध्ये सदनाची कारवाई सुरु असताना अश्लील व्हिडीओ पाहताना कॅमेरात कैद झाले होते.
या आरोपांवर स्पष्टीकरण देताना राठोड म्हणाले की, मला प्रश्न विचारायचे असल्याने सभागृहात मोबाईल घेऊन आलो होते. त्याचसंदर्भात मी मोबाईल पाहत असताना, त्यावेळी माझ्या मोबाईलची मेमरी फूल झाल्याचे दिसले. त्यानंतर मी मोबाईलमधील व्हिडीओ क्लिप डिलीट करु लागलो.
Read Also :
- ‘हायवेवर शिवसैनिकांनी काढली बंदूक, आणि…’, गृहमंत्र्यांपर्यंत पोहचलं प्रकरण
- ‘संत आणि हिंदू धर्माच्या आस्थेचा अपमान करणं, ही काँग्रेसची जुनी परंपरा’
- ‘राहुल गांधी लोकांना हिंसेसाठी प्रवृत्त करत आहेत’, स्मृती इराणींचे जोरदार प्रत्युत्तर
- शेतकरी आंदोलन मोडित काढण्याचा प्रयत्न, राजू शेट्टींचा गंभीर आरोप
- महाविद्यालय सुरू करण्याच्या मुद्यावरून राज्यपाल-ठाकरे सरकार आमनेसामने?