मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या कन्या पूर्वशी यांचा साखरपुडा पार पडला. सांताक्रुझ येथील ग्रँड हयात हॉटेलमध्ये हा साखरपुडा संपन्न झाला. संजय राऊत यांच्या या घरातील कार्यक्रमाला राज्यातील विविध पक्षातील नेत्यांनी हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले.
ग्रँड हयात हॉटेलमध्ये राऊत यांच्या कन्या पूर्वशी आणि ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांचा साखरपुडा प्रसन्न वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह अनेक नेतेमंडळी उपस्थित होते.
संजय राऊत यांचे जावई कोण आहेत ?
राऊत यांच्या कन्या पूर्वशीचा विवाह मल्हार नार्वेकर यांच्याशी होणार आहे. मल्हार हे ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव आहेत.
मल्हार यांचा स्वतःचा व्यवसाय असल्याचे सांगितले जाते. तसेच ते आयटी इंजिनिअर देखील आहेत. तर दुसरीकडे पूर्वशी देखील उच्चशिक्षित असून त्यांनी ‘ठाकरे’ चित्रपटाच्या निर्मितीची धुरा सांभाळली आहे. सायनमध्ये त्यांचे ऑफिस आहे.
मल्हार यांचे वडील राजेश नार्वेकर ठाण्याचे जिल्हाधिकारी होण्यापूर्वी 2018 मध्ये मुख्यमंत्र्यांचे सहसचिव होते. त्यापूर्वी त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यात व रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळलेली आहे.
Read Also :
- आज अर्थसंकल्प! अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी सरकार कोणत्या घोषणा करणार ?
- विधान परिषदेत पॉर्न पाहताना आढळला काँग्रेस आमदार ? स्पष्टीकरण देताना म्हणाला…
- ‘हायवेवर शिवसैनिकांनी काढली बंदूक, आणि…’, गृहमंत्र्यांपर्यंत पोहचलं प्रकरण
- ‘संत आणि हिंदू धर्माच्या आस्थेचा अपमान करणं, ही काँग्रेसची जुनी परंपरा’
- ‘राहुल गांधी लोकांना हिंसेसाठी प्रवृत्त करत आहेत’, स्मृती इराणींचे जोरदार प्रत्युत्तर