पुणे : पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेच्या समर्थकांना एनआयए या केंद्रीय तपास यंत्रणेने ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ पुण्यात पीएफआय संघटनेच्या समर्थकांनी आंदोलन केले. यावेळी पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांनी पाकिस्तान झिंदाबाद, अल्लाहू अकबर अशी घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
“शीतल ताई डोळ्याच्या दवाखान्यात जाऊन गुडघा तपासून घ्या”; सुळेंच्या त्या फोटोवरून राष्ट्रवादी आक्रमक
भारत आणि महाराष्ट्रात कोणी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देत असतील तर त्यांना आम्ही सोडणार नाही. ते लोक ज्याठिकाणी पाकिस्तानच्या घोषणा देत आहेत. त्यांना शोधून ज्याठिकाणी ते असतील त्याठिकाणांहून त्यांना उचलून अटक केली जाईल आणि योग्य ती कारवाई त्यांच्यावर होईल. अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
“बीकेसीवर दसरा मेळावा अन् शिवाजीपार्कवर हसरा मेळावा”
PFI संघटनेच्या राज्यस्तरीय नेत्यांना NIA, ED या केंद्रीय तपास यंत्रणेने अटक केल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करणाऱ्या 60 ते 70 जणांवर पुणे पोलिसांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. रिजाज जैनुद्दीन सय्यद (वय 26, शिवनेरी नगर कोंढवा खुर्द) याच्यासह 60 ते 70 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भादवी 141 143 145 147 149 188 341 सह मपोका 37/1/3 सह 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
“ठाकरेंना मिळालेली परवानगी म्हणजे शिंदे-फडणवीस सरकारचा मुखभंग”; काॅंग्रेसने डिवचलं
पोलीस हवालदार नवनाथ डांगे यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. PFI च्या राज्यस्तरीय नेत्यांना अटक केल्याच्या निषेधार्थ आरोपींनी मोठमोठ्याने घोषणा देत रस्ता अडवला. त्यात पाकिस्तान झिंदाबाद, अल्लाहू अकबरचे नारे देण्यात आले. येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना व वाहनांना अडथळा निर्माण करून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सूचनेकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.
Read also
- PFI च्या कार्यकर्त्यांना अटक केल्यानंतर पुण्यात पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा
- “गद्दारांना क्षमा नाही, तात्काळ माफी माग, नाहीतर..;” रूपाली पाटलांचा म्हात्रेंना सज्जड दम
- “महाराष्ट्रावर संकट..! अन् शिंदे सरकार दिल्ली वारी एन्जॉय करताहेत”
- “अमित शहा, फडणवीसांना पुढेपण भेटणार”; भाजप प्रवेशाबाबत खडसेंचं स्पष्टीकरण
- “मला वाटलं तर आदित्यच लग्न मुलीशी जमलं म्हणून जल्लोष करत असतील”; नितेश राणे