मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यात शिवाजी पार्क येथे दसरा मेळावा कोण घेणार याकडे सगळ्याचं लक्ष लागून राहिलं होतं. शिंदे आणि ठाकरे या दोन्ही बाजूंनी त्यासाठी महापालिकेत अर्ज दाखल केले होते. मात्र कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून महापालिकेने दोन्ही अर्ज फेटाळून लावले. त्यानंतर ठाकरेंनी यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र कोर्टात झालेल्या सुनावणीत उद्धव ठाकरे यांना शिवाजी पार्क येथील मैदानावर दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी दिली आहे.
“मुख्यमंत्र्यांची खिल्ली उडवण्याची एकही संधी सोडली जात नाही”
शिवतीर्थावर उच्च न्यायालायाने उद्धव ठाकरेंना परवानगी दिल्यानंतर काॅंग्रेसेने शिंदे-फडणवीस सरकारला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. काॅंग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी असं म्हटलं आहे की, शिवसेनेला दसरा मेळाव्याला उच्च न्यायालयाकडून मिळालेली परवानगी शिंदे-फडणवीस सरकारचा मुखभंग आहे. शासन द्वेष, तिरस्कार आणि सुडाने करायचे नसते हा धडा यातून ते शिकले तर त्यांच्यासाठीच बरे होईल. असाही सल्ला त्यांनी दिला आहे.
शिवतीर्थ मैदान कुणाला मिळणार? कोर्टात दोन्ही बाजूंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद
त्यानंतर राज्यातील शिवसैनिकांकडून जल्लोष करण्यात येत आहे. तर न्यायालयाच्या या निर्णयाचं राज्यातील राजकीय नेत्यांनी स्वागत केलं आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी यावर पंरपरा अबाधित राहिली..! सर्व निष्ठावान शिवसैनिकांचे अभिनंदन असं ट्विट केलं आहे. तर शिवसेनेच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी बाळासाहेबांचे विचार जिंकले.. उद्धव ठाकरे साहेबांचा निर्धार जिंकला. शिवसेनेची पंरपरा जिंकली. दसरा मेळावा शिवतीर्थावरच असं ट्विट केलं आहे.
“मुख्यमंत्र्यांची खुर्ची आहे की किराण्याचा गल्ला?” कायंदेंनी श्रीकांत शिंदेंना सुनावलं
2012 साली शिवसेनेने एमएमआरडीए मैदानावर दसरा मेळावा घेतला होता. त्यामुळे शिवाजी पार्क आणि दसरा मेळावा असे समीकरण दिसत नाही. 2013 पासूनच शिवसेनेने मैदानावरील राजकीय सभेचा अधिकार गमावला आहे. न्यायालयात महापालिकेच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला. तसेच शिवाजी पार्क कोणालाही देण्यासाठी महापालिकेचा विरोध दसरा मेळावा ही पंरपरा पण अधिकार असन शकत नाही. असा देखील युक्तिवाद महापालिकेच्या वकिलांनी केला.
Read also
- बाळासाहेबांचे विचार जिंकले..! दसरा मेळावा शिवतीर्थावरच
- शिवतीर्थावर आवाज ठाकरेंचाच घुमणार; दसरा मेळाव्यासाठी उद्धव ठाकरेंना परवानगी मिळाली
- “यामध्ये काही फायदा नाही, तरीदेखील मोदींनी आमच्यासाठी..;” पंकजा मुंडे
- “रावसाहेब दानवेंचा अधिकार फडणवीसांनी हिसकावला”; राष्ट्रवादीची उपमुख्यमंत्र्यावर टिका
- “मी खासदार आहे, कुठे बसायचं अन् कुठे नाही हे कळत मला”; व्हायरल झालेल्या फोटोवर शिंदेंचं स्पष्टीकरण