मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यात शिवाजी पार्क येथे दसरा मेळावा कोण घेणार याकडे सगळ्याचं लक्ष लागून राहिलं होतं. शिंदे आणि ठाकरे या दोन्ही बाजूंनी त्यासाठी महापालिकेत अर्ज दाखल केले होते. मात्र कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून महापालिकेने दोन्ही अर्ज फेटाळून लावले. त्यानंतर ठाकरेंनी यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र कोर्टात झालेल्या सुनावणीत उद्धव ठाकरे यांना शिवाजी पार्क येथील मैदानावर दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी दिली आहे.
“मुख्यमंत्र्यांची खुर्ची आहे की किराण्याचा गल्ला?” कायंदेंनी श्रीकांत शिंदेंना सुनावलं
2012 साली शिवसेनेने एमएमआरडीए मैदानावर दसरा मेळावा घेतला होता. त्यामुळे शिवाजी पार्क आणि दसरा मेळावा असे समीकरण दिसत नाही. 2013 पासूनच शिवसेनेने मैदानावरील राजकीय सभेचा अधिकार गमावला आहे. न्यायालयात महापालिकेच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला. तसेच शिवाजी पार्क कोणालाही देण्यासाठी महापालिकेचा विरोध दसरा मेळावा ही पंरपरा पण अधिकार असन शकत नाही. असा देखील युक्तिवाद महापालिकेच्या वकिलांनी केला.
“गब्बर होतायेत शेजारी, महाराष्ट्र पडतोय आजारी, व्वा रे सत्तधारी..!”
त्यावर 2016 च्या आदेशात अन्य कोणी परवानगी मागू नये असे म्हटले आहे का? हायकोर्टाची शिवसेनेच्या वकिलांकडे विचारणा करण्यात आली की पहिल्यांदा अर्ज कोणी केला. त्यावर 22 आणि 26 ऑगस्टला आमचा अर्ज, शिवसेनेच्या वकिलांनी न्यायालयात माहिती दिली. आमच्या अर्जानंतर शिंदे गटाचा अर्ज महापालिकेत गेला असल्याचं ठाकरेंच्या वकिलांनी म्हटलं आहे.
“मशिदीवरील भोंगे, टोलनाके, आता राज ठाकरेंनी हाती घेतला नवीन मुद्दा” राज्य सरकारलाही दिला इशारा
दरम्यान, न्यायालयाने दोन्ही बांजूचे युक्तिवाद ऐकून घेतले. त्यानंतर या युक्तिवादांवर निरिक्षण नोंदवत याप्रकरणाचा निकाल उद्धव ठाकरे यांच्या बाजूने दिला आहे. त्यामुळे शिंदे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. याचसोबत आज निवडणुक चिन्ह आणि राजकीय पक्षांबाबत येत्या 28 सप्टेंबर रोजी न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे याचा निकाल कुणाच्या बाजूने लागणार त्याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.
Read also
- “यामध्ये काही फायदा नाही, तरीदेखील मोदींनी आमच्यासाठी..;” पंकजा मुंडे
- “रावसाहेब दानवेंचा अधिकार फडणवीसांनी हिसकावला”; राष्ट्रवादीची उपमुख्यमंत्र्यावर टिका
- “मी खासदार आहे, कुठे बसायचं अन् कुठे नाही हे कळत मला”; व्हायरल झालेल्या फोटोवर शिंदेंचं स्पष्टीकरण
- “मुख्यमंत्र्यांची खिल्ली उडवण्याची एकही संधी सोडली जात नाही”
- शिवतीर्थ मैदान कुणाला मिळणार? कोर्टात दोन्ही बाजूंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद