मुंबई : दसरा मेळाव्याच्या रोजी शिवाजी पार्क येथील मैदानासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात राजकीय लढाई सुरू झाली. दोन्ही बाजूंनी शिवाजी पार्क येथील मैदानावर दावा ठोकण्यात आला. अखेर ही लढाई उच्च न्यायालयात गेली आणि हा मैदान न्यायालयात उद्धव ठाकरे यांनी जिंकला. तर तिकडे शिंदे गट बीकेसी मैदानावर आपला दसरा मेळावा घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. यावरून आता भाजपने उद्धव ठाकरे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
“यामध्ये काही फायदा नाही, तरीदेखील मोदींनी आमच्यासाठी..;” पंकजा मुंडे
उद्धव ठाकरे यांना दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क येथे परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता हा दसरा मेळावा 6 ऑक्टोंबर रोजी होणार आहे. उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यामध्ये विरोधकांवर तोफ डागण्याची शक्यता आहे. विशेषकरून शिवसेनेच्या 40 बंडखोर आमदार आणि त्यात भाजपविरोधात जोरदार हल्ला उद्धव ठाकरे चढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
“रावसाहेब दानवेंचा अधिकार फडणवीसांनी हिसकावला”; राष्ट्रवादीची उपमुख्यमंत्र्यावर टिका
ठाकरेंना परवानगी दिल्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर टिकात्मक टिप्पणी करत त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. भाजप नेते केशव उपाध्यय यांनी बीकेसीवर दसरा मेळावा आणि शिवाजीपार्कवर हसरा मेळावा होणार असल्याचा टोमणा हाणला आहे. तर फक्त मैदानावर सभा घेण्याची परवानगी मिळाली ना..! मला वाटलं तर आदित्यच लग्न मुलीशी जमलं म्हणून जल्लोष करत असतील नाचे कुठले..! अशी टिप्पणी भाजप आमदार नितेश राणे यांनी केली आहे.
“मी खासदार आहे, कुठे बसायचं अन् कुठे नाही हे कळत मला”; व्हायरल झालेल्या फोटोवर शिंदेंचं स्पष्टीकरण
दरम्यान, एकनाथ शिंदे, भाजप आणि उद्धव ठाकरे यांच्या वादात मनसेनेही उडी घेतली आहे. मनसेचे नेते गजानन काळे यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, अखेरीस दसऱ्याला शिवतीर्थावर टोमणे मेळाव्यात लाफ्टर चॅलेंज चा प्रयोग पार पडणार व महाराष्ट्राचे मनसोक्त मनोरंजन होणार. तेवढी संजय राऊत यांची रिकामी खुर्ची याही वेळा ठेवा. पत्राचाळीत 700 मराठी कुटुंबाना बेघर करणारे कळू द्या महाराष्ट्राला. बाकी भूतलावरील सगळे प्राणी मामू खाली आणतीलच असं खणखणीत टोला देखील त्यांनी लगावला.
Read also
- “शीतल ताई डोळ्याच्या दवाखान्यात जाऊन गुडघा तपासून घ्या”; सुळेंच्या त्या फोटोवरून राष्ट्रवादी आक्रमक
- “बीकेसीवर दसरा मेळावा अन् शिवाजीपार्कवर हसरा मेळावा”
- “ठाकरेंना मिळालेली परवानगी म्हणजे शिंदे-फडणवीस सरकारचा मुखभंग”; काॅंग्रेसने डिवचलं
- बाळासाहेबांचे विचार जिंकले..! दसरा मेळावा शिवतीर्थावरच
- शिवतीर्थावर आवाज ठाकरेंचाच घुमणार; दसरा मेळाव्यासाठी उद्धव ठाकरेंना परवानगी मिळाली