पुणे : शिवसेनेचे बंडखोर खासदार श्रीकांत हे मुख्यमंत्र्यांच्या खूर्चीवरून कारभार करीत असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला होता. त्यानंतर श्रीकांत शिंदे यांनी यावर स्पष्टीकरण देताना मागील बोर्ड बघितला नसता. तसेच हा ऑफिस वर्षा किंवा मंत्रालायतील नसून हा माझ्याच घरातील असल्याचं त्यांनी सांगितलं. यातच आता शिवसेनेच्या बंडखोर नेत्या शितल म्हात्रे यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा एक फोटो ट्विट केल्यामुळे वाद निर्माण झाला आहे.
“रावसाहेब दानवेंचा अधिकार फडणवीसांनी हिसकावला”; राष्ट्रवादीची उपमुख्यमंत्र्यावर टिका
शितल म्हात्रे यांनी राष्ट्रवादीच्या खासदास सुप्रिया सुळे यांचा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसलेला एक फोटो ट्विट केला आहे. परंतु तो फोटो इडीट केलेला असून त्याचा पुरावा राष्ट्रवादीने दिला आहे. त्यानंतर शितल म्हात्रे यांचा समाचार राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी घेतला आहे. शीतल ताई डोळ्याच्या दवाखान्यात जाऊन गुडघा तपासून घ्या. असा टोला राष्ट्रवादीचे नेते सुरज चव्हाण यांनी म्हटलं आहे.
“मी खासदार आहे, कुठे बसायचं अन् कुठे नाही हे कळत मला”; व्हायरल झालेल्या फोटोवर शिंदेंचं स्पष्टीकरण
तर आमच्या नेत्या सुप्रिया सुळे यांचे फोटो मॉर्फिंग करून ते ऑनलाईन पद्धतीने प्रसारित करून त्यांची बदनामी करण्याचा गुन्हा मिंध्ये सेनेच्या शीतल म्हात्रे यांनी केला आहे. आता शीतल म्हात्रे गोईंग टु जेल..! चक्की पिसींग, चक्की पिसींग और चिक्की पिसींग असा घणाघात राष्ट्रवादीचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी केला आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी आणि बंडखोर आमदारांमध्ये जोरदार राजकीय युद्ध सुरू झालं आहे.
“मुख्यमंत्र्यांची खिल्ली उडवण्याची एकही संधी सोडली जात नाही”
दरम्यान, गद्दाराना क्षमा नाही. गद्दार फेम शीतल म्हात्रे यांनी मिंधे गटाला खुशकरण्यासाठी सुप्रिया सुळे यांची महिला असूनही जाणीवपुर्वक मोबिंग फोटो करत बदनामी केली आहे. अमृता फडणवीस यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्यावर लगेच गुन्हा दाखल होत कारवाई होते. तीच तत्परता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे इथं दाखवतील का? असा सवाल राष्ट्रवादीच्या पुणे शहाराच्या उपाध्यक्षा रूपाली पाटील यांनी केला आहे. तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल होणारच..त्यांनी तात्काळ माफि मागावी, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
Read also
- “बीकेसीवर दसरा मेळावा अन् शिवाजीपार्कवर हसरा मेळावा”
- “ठाकरेंना मिळालेली परवानगी म्हणजे शिंदे-फडणवीस सरकारचा मुखभंग”; काॅंग्रेसने डिवचलं
- बाळासाहेबांचे विचार जिंकले..! दसरा मेळावा शिवतीर्थावरच
- शिवतीर्थावर आवाज ठाकरेंचाच घुमणार; दसरा मेळाव्यासाठी उद्धव ठाकरेंना परवानगी मिळाली
- “यामध्ये काही फायदा नाही, तरीदेखील मोदींनी आमच्यासाठी..;” पंकजा मुंडे