जळगाव : राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे आणि त्यांच्या सुन आणि खासदार रक्षा खडसेंसह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार होते. परंतु अमित शहा यांचं वेळापत्रक व्यस्त असल्याकारणाने त्यांची भेट होऊ शकली नाही. त्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांची अमित शहांशी फोनवरून चर्चा झाल्याची माहिती खुद्द भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनीच दिली आहे. त्यावरून एकनाथ खडसे पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या समोर आल्या. त्यावर आता खडसेंनी स्पष्टीकरण दिलं आहे.
शिवतीर्थावर आवाज ठाकरेंचाच घुमणार; दसरा मेळाव्यासाठी उद्धव ठाकरेंना परवानगी मिळाली
अमित शहा हे देशाचे गृहमंत्री आहे, नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहे. अमित शहा यांना भेटू नये, असा काही नियम आहे का? अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांचे माझे जुने संबध आहे. गोधडीमध्ये होते, तेव्हापासून परिचय आहे. मी अमित शहा यांनी एकवेळा भेटलो असं नाही, याआधीही भेटलो आहे, देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा मी भेटणार आहे, म्हणून याचा वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही, असं खडसेंनी म्हटलं आहे.
“यामध्ये काही फायदा नाही, तरीदेखील मोदींनी आमच्यासाठी..;” पंकजा मुंडे
एका घरामध्ये दोन पदं आहे, हे काही आमच्याच घरात नाही. गिरीश महाजन यांच्या घरामध्ये 30 वर्षापासून साधनाताई जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष होत्या. आता नगराध्यक्ष आहे. गुलाबराव पाटील यांचा मुलगा हा जिल्हा परिषदेचा सदस्य होतो. एका घरामध्ये अनेक जण असतातच. राजकारणामध्ये जाच्यामध्ये निवडून येण्याची क्षमता असते, ते निवडून येतात, ज्यांच्यामध्ये क्षमता नसते जनता त्याला पराभूत करते असं देखील खडसेंनी विरोधकांना सुनावलं.
“रावसाहेब दानवेंचा अधिकार फडणवीसांनी हिसकावला”; राष्ट्रवादीची उपमुख्यमंत्र्यावर टिका
दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये जोरदार टिका टिप्पणी सुरू आहे. यातच एकनाथ खडसे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. यातच कॅबिनेट मंत्री आणि भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी देखील अशाच प्रकारची भविष्य़वाणी केली होती की खडसे भविष्यात भाजपमध्ये येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकऱणाबाबत राज्यात एकच चर्चा रंगली आहे.
Read also
- “मला वाटलं तर आदित्यच लग्न मुलीशी जमलं म्हणून जल्लोष करत असतील”; नितेश राणे
- “शीतल ताई डोळ्याच्या दवाखान्यात जाऊन गुडघा तपासून घ्या”; सुळेंच्या त्या फोटोवरून राष्ट्रवादी आक्रमक
- “बीकेसीवर दसरा मेळावा अन् शिवाजीपार्कवर हसरा मेळावा”
- “ठाकरेंना मिळालेली परवानगी म्हणजे शिंदे-फडणवीस सरकारचा मुखभंग”; काॅंग्रेसने डिवचलं
- बाळासाहेबांचे विचार जिंकले..! दसरा मेळावा शिवतीर्थावरच