मुंबई: पावसाळी अधिवेशनात अपेक्षेप्रमाणे राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपाचं आक्रमक भुमिका बघायला मिळाली आहे. सोमवारी पहिल्या दिवशी विधानसभेत झालेल्या राड्यानंतर दुसऱ्या दिवशी भाजपाकडून विधानभवनाबाहेर प्रतिसभागृह चालवण्यात आलं. भाजपाच्या १२ आमदारांच्या निलंबनाचा यावेळी निषेध करत भाजपाच्या अनेक सदस्यांनी आक्रमक भाषणं देखील केली. मात्र, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी यासंदर्भात ट्वीट करत भाजपावर निशाणा साधला आहे. “देवेंद्र फडणवीसांचं डोळा मारणंच सारंकाही सांगून जातं”, असा खोचक टोला देखील सचिन सावंत यांनी या मारला आहे.
हे पण वाचा: भाजप आमदाराचे निलंबन लोकशाहीची हत्या, राष्ट्रवादीच्या १९ आमदारांचे निलंबन झाले तेव्हा हत्या नाही का?
हे पण वाचा: धक्काबुक्की, धमक्या देणे , शिवीगाळ करणे याला माज म्हणतात, सचिन सावंत यांची भाजपवर टीका
सचिन सावंत यांनी भाजपाच्या प्रतिसभागृहाच्या प्रकारावर आणि त्यानंतरच्या आक्रमक पवित्र्यावर, तसेच सोमवारच्या राड्यावरून टीका केली आहे. “भाजपाचे विरोधीपक्ष म्हणून वर्तन अत्यंत हिडीस आहे. काल खुलेआम धमक्या, शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली. विधिमंडळाच्या आवारात माईक आणि स्पीकरचा वापर ते कसा करू शकतात? संविधानिक जबाबदारी व लोकशाही मूल्यांचा हा पूर्णपणे अनादर आहे. देवेंद्र फडणवीसजींचं डोळा मारणं सर्व काही सांगून जातं!” असं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.
हे पण वाचा: भाजपच्या तब्बल १२ आमदारांचे एक वर्षासाठी निलंबन
हे पण वाचा: मी फडतूस माणसांविषयी बोलत नाही, नितेश राणे यांच्या टीकेला भास्कर जाधव यांचे प्रत्युत्तर
…आणि फडणवीसांनी मारला डोळा!
आपल्या ट्वीटसोबत सचिन सावंत यांनी एबीपी माझा वृत्तवाहिनीवरील व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओमध्ये देवेंद्र फडणवीस डोळा मारताना दिसत आहेत. प्रतिसभागृहाचा प्रकार प्रशासनाने मोडीत काढल्यानंतर माध्यमांशी बोलताना आक्रमक झालेल्या देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर शेवटी बाजूला उभ्या असलेल्या व्यक्तीकडे बघून डोळा मारल्याचं या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. त्यावरून सचिन सावंत यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे.
भाजपाचे विरोधीपक्ष म्हणून वर्तन अत्यंत हिडीस आहे. काल खुलेआम धमक्या, शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली. आज विधिमंडळाच्या आवारात माईक आणि स्पीकरचा वापर ते कसा करु शकतात? संविधानिक जबाबदारी व लोकशाही मूल्यांचा हा पूर्णपणे अनादर आहे.@Dev_Fadnavis जींचे डोळा मारणे सर्व काही सांगून जाते! pic.twitter.com/QrTValPix1
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) July 6, 2021
हे पण वाचा: भास्कर जाधव यांना मिळणार संरक्षण; गृहमंत्र्यांनी दिली विधानसभेत ग्वाही
हे पण वाचा: भास्कर जाधवांना सोशल मीडियावरून जीवे मारण्याच्या धमक्या, केली सुरक्षा पुरवण्याची मागणी
भाजपच्या कोणत्या आमदारांचं निलंबन?
ओबीसी आरक्षणावरील ठरावावर चर्चा सुरू असताना राजदंड उचलणे, माईक ओढणे आणि सभागृह अध्यक्षांना शिवीगाळ केल्याप्रकरणी आज एकूण १२ सदस्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. आशिष शेलार, योगेश सागर, अभिमन्यू पवार, संजय कुटे, अतुल भातखळकर, पराग अळवणी, गिरीश महाजन, राम सातपुते, हरीश पिंपळे, नारायण कुचे, जयकुमार रावत किर्तीकुमार बागडीया आदी आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आलं आहे. या वर्षभरात त्यांना मुंबई आणि नागपूर येथील अधिवेशनात सामिल होण्यास मज्जाव करण्यात आला आहे.