मुंबई : काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या रेणू शर्मा नावाच्या महिलेने बलात्काराचा आरोप केल्यानंतर राज्यातील राजकारणात वादळ उठले होते. मात्र रेणू शर्मावरच अनेक आरोप झाल्यानंतर अखेर तिने आपली तक्रार मागे घेतली होती. मात्र या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे रेणू शर्माच्या बहिण करूणासोबत असलेले संबंध समोर आले होते.
धनंजय मुंडे आणि करूणा यांना दोन मुले देखील आहेत. मात्र रेणू शर्मासोबतच्या वादावर पडदा पडल्यानंतर आता मुंडे आणि करूणा यांच्यातील वाद देखील मिटण्याची शक्यता आहे.
वाद सोडवण्यासाठी दोघांकडून मध्यस्थाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. न्यायालयात यासंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलेले असून आता हे प्रकरण मध्यस्थांसमोर जाणार आहे. मध्यस्थीचा खर्च धनंजय मुंडे करणार आहेत.
मुंडे यांचे वकील शार्दूल सिंग आणि महिलेचे वकील ए. आर. शेख यांनी न्यायालयात संमतिपत्रक दाखल केले. हा वाद सोडवण्यासाठी मध्यस्थीची नियुक्ती केली असून, दोघांनीही त्यासाठी संमती अटी घातल्या आहेत.
Read Also :
- ‘आता फार काळ विरोधी पक्षात राहायचे नाही’, फडणवीसांचे सूचक वक्तव्य
- भाजपच्या मनधरणीला अपयश, शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी अण्णा हजारे करणार उपोषण
- ‘आता एक बाजू निवडण्याची वेळ आलीये’, शेतकरी आंदोलनाबाबत राहुल गांधींनी मांडली भूमिका
- ‘मोदींना फोनवर विनंती केल्यानंतर विधान परिषदेवर गेलात’, भातखळकरांचा उद्धव ठाकरेंना टोला
- ‘राष्ट्रवादी परिवार संवाद’ दौर्याला सुरुवात, जयंत पाटील 18 दिवसात घेणार 82 मतदारसंघांचा आढावा